स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रूपये निधी वितरीत करणा-या पालकमंत्री धनंजय मुंडे यांची  दिव्यांगाना सावत्र वागणूक , दिव्यांग घटकांना निदान कर्ज तरी दया - डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर ----------------------------------------------


(बीड प्रतिनिधी --  विवेक कुचेकर):- - महाराष्ट्र  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांनी स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रूपयांचा निधी वितरित केला आहे,आमच्या अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३५ कोटींचा निधी सामाजिक व न्याय विभागाकडून दि. २८ आगस्ट रोजी वितरीत करण्यात आला या आपल्या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल दिव्यांग बांधवांतर्फे आपले विशेष अभिनंदन मात्र याचवेळी  बीड जिल्हायातील सातशे ते आठशे दिव्यांग व्यक्तीनी अंपग आर्थिक विकास महामंडळाकडे कर्ज मागणी अर्ज केलेले  आहेत. सध्या दिव्यांग घटक आर्थिक अडचणीत आहे ,त्यांना पालकमंत्री या नात्याने त्यांचे   पालकत्व स्विकारून कर्ज प्रकरणे मंजूर करून निकाली काढुन  आर्थिक आधार देण्यात यावा अशी लेखी मागणी  सामाजिक कार्यकर्ते तथा दिव्यांग संघर्ष संघर्ष समिती  बीड तालुका अध्यक्ष डॉ गणेश ढवळे  लिंबागणेशकर यांनी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना केली आहे.


सध्या कोरोनामुळे विषाणु चर्या लढाई विरोधात  जिल्हाप्रशासनाच्या   आदेशानुसार "लॉकडाऊन "मुळे हा दिव्यांग घटक आर्थिक संकटात सापडला असुन उपासमारीचे जीवन जगत आहे यांचे पालकत्व पालकमंत्री धनंजय मुंडे स्विकारणार आहेत की नाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड या पदावर असलेल्या ना.धनंजय मुंडे दिव्यांग बांधवांना कधी न्याय देणार? त्यांचे पालकत्व कधी स्विकारणार ??  असा प्रश्न  दिव्यांग बांधवांना पडला  आहे. सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुडे साहेब आपल्या जिल्हायात दिव्यांग आपल्या न्यायची वाट आतुरतेने पाहत आहेत यांच्या प्रश्नाकडे पण लक्ष दया त्यांना सावत्रपणाची वागणुक देऊ नका, आणि तात्काळ अंपग आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरण निकाली काढावे आणि दिव्यांग घटकांना न्याय द्यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे     ना. धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना ई-मेल व्दारे केली आहे, दिव्यांग संघर्ष समिती बीड तालुका अध्यक्ष डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर , शेख जिलानी,संतोष कोकाटे, शेख आलम,अशोक दगडखैर,दत्ता कदम, संतोष राख,हानुमंत काळूशे, पोपट पोकळे,वैभव देशमुख, शेख शेरु, शेख नदीम , शेख मतीन, ईश्वर आमटे, बजरंग लांडगे, ईश्वर माने , यांनी म्हटले आहे