बीड प्रतिनिधी:-
मुद्दे.....
1)रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिसनर ला एव्हडे नियम मग केंगाडिना डिग्री सर्टिफिकेट नसतानाही प्रॅक्टिस ची मुभा का?
2)यांच्यावर आरोग्य यंत्रनेचा अंकुश आहे की नाही?
3)चार पाच वर्ष ते दहा वर्षांपासून जागा बदलून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा यांना अधिकार दिला कोणी ?
4)सर्रासपणे स्टेरोईड्स चा वापर करतात.त्यामुळे सुरुवातीला रुग्णांना अराम पडतो पण पाच ते सात वर्षांनी रुग्णाची किडनी,लिव्हर,त्वचा तसेच इतर व्हायट्ल ऑर्गन खराब होतात.
5)गावागावात जणजागृती व्हायला पाहिजे,सरपंच,सदस्य व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी,नागरिकांनी अश्या नाममात्र डॉक्टराणा चोप दिला पाहिजे.
6)स्वस्त आहे किंवा स्वस्त मिळते म्हणून अश्या लोकांकडून उपचार घेऊ नयेत आणि घेतल्या काही वर्षांनी त्याचे दुरगामी परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
7)आरोग्य यंत्रणा फक्त बीएचएमएस व बीएएमएस च्याच मागे का लागती.यांना वर्षानुवर्षे केंगाडीची मोघम प्रॅक्टिस करणारे दिसत नाही काय ?त्याच्यावर कार्यवाही करणार कधी ?
खेड्यापाड्यात आरोग्य यंत्रनेच्या डोळ्यात धुळ घालून केंगाडी डॉक्टर सर्रासपने प्रॅक्टिस करताना दिसतात.एखादा युपी, बिहारी, चांदसी ( स्वयंघोषित डॉक्टर ) एखाद खेड पाहतो आणि आपले बिऱ्हाड घेऊन कोसो दूरवरुन येऊन इथे प्रॅक्टिस करतो.कोणाला थांग पत्ताही लागत नाही पण आमचा बीएचएमएस बीएएमएस जनरल प्रॅक्टिसनर जेंव्हा प्रॅक्टिस करतो तेंव्हा त्याला हजारो अडचणीना तोंड द्यावे लागते मग शासनाचे किंवा आरोग्य यंत्रनेचे हे 'केंगाडी' स्वतःला डॉक्टर म्हणणारे जावई आहेत की काय ? जेणेकरून त्याच्यावर कसलीच कार्यवाही होत नाही ? त्यांना कसलेच नियम नाहीत.असा सवाल हिमा डॉक्टर संघटनेचे सन्माननीय जिल्हा महासचिव मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे. सध्या कोरोना गंभीर अवस्थेत आहे दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या अस्वस्थ करणारी आहे. नवीन रुग्णांना,अनोळखी रुग्णांना,खोकला,तापाच्या रुग्णांना उपचार करताना प्रचंड भीती जनरल प्रॅक्टिसनर मध्ये दिसतेय कारण शहरातील मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये सुद्धा पेशंट ची हेळसांड होताना दिसते आहे,तशा बातम्या ही येत आहेत .सर्दी ,ताप व खोकला,कॉमन फ्लू,जनरल विकनेस च्या रुग्णांना काही हॉस्पिटल घेत नाहीयेत याचा अतिरिक्त भार आमच्या सामान्य डॉक्टर वर पडताना दिसतो आहे.तसे आम्ही खंबीर आहोत पडल तितका भार झेपन्याची ताकत एका जनरल प्रॅक्टिसनर मध्ये असतेच पण विषय जबाबदारीचा आहे.क्रिटिकल पोसिशन मध्ये आपण जबाबदारी झटकत असाल आणि आमचा उपयोग फक्त गरजे पुरता तात्पुरता करत असाल तर याला अर्थ नाही .आरोग्य प्रशासनाणे याकडे लक्ष देऊन वेळीच शासन दरबारीं जनरल प्रॅक्टिसनर ला सामावून घ्यायला पाहिजे असे मत होमीओपैथीक डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव मा.डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
का नियम फक्त आम्हालाच लागू आहेत या मोकाट स्वतःकडे कसलीच पदवी नसताना फक्त थातुरमातुर कंपाऊडर म्हणून काही दिवस काम करायचे आणि कुठेतरी लांब खेड्यात जाऊन बसायचे स्वतःला डॉक्टर म्हणत असे आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना तात्काळ हाकलून द्या.आता आपण 20 व्या शतकात आहोत आपल्याला स्वस्त पडत म्हणून त्यांच्या बिनबुडाच्या ज्ञानाच्या गोळ्या औषधी खाऊ नका.त्या डॉक्टराणी महाराज लोक मॅनेज केली मंदिर प्रशासन मॅनेज केली आहेत आणि ते उघड्यावर येऊन भोळ्या भाबड्या लोकांना स्टेरोईड देतात.त्यामुळे रुग्णांना तात्काळ बरे वाटते पण नंतर खूप गंभीर समस्याना सामोरे जावे लागते आणि त्याची गंभीरता ना त्या रुग्णांना असतें ना त्या केंगाडी ला असतें तो दोन तीन वर्षात जागा बदलतो आणि आपली बिचारी मानसे त्यांची शिकार बनतात.खेड्यात कॅन्सर,किडनी,लिव्हर फेल चे रुग्ण वाढत आहेत याच कारण म्हणजे हीच केंगाडि लोक आहे त्यामुळे यांना आरोग्य यंत्रनेने योग्य पाऊले उचलून कार्यवाही करावी असा सल्ला डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.
शेतकरी,गरीब बांधवाना झटपट अराम पाहिजे असतो .तात्काळ लवकर बरे व्हायचं असत आणि ते पण स्वस्त औषधी उपचारामध्ये आणि याला साजेस व या परिस्थिती चा योग्य फायदा हे केंगडी डॉक्टर घेतात . ही मंडळी कोठेतरी दुसऱ्या राज्यातून येते येथील सरपंच व काही मंडळी मॅनेज करते एव्हाना काहींना हप्ते देते आणि याचाच फायदा घेऊन आरोग्य यंत्रनेच्या डोळ्यात धुळ टाकून ही केंगडी मंडळी सर्रासपणे गरीब मायबाप जनतेच्या जीवाशी खेळतांना दिसते आहे.कोणत्याही गोळ्या असो त्या लूज करून विकायच्या असा त्यांचा जीवघेणा प्रयोग चालू असतो यांच्याकडून काहीही झाले तरी ते रातोरात पळून जायला तयार असतात.गावातील प्रत्येक सरपंच व नागरिकांनी खबरदारी घेऊन अश्या केंगडी बिना परवाना डॉक्टराणा वेळीच पळवून लावले पाहिजे त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे याउलट आमच्या प्रॅक्टिसनर कडून काही चूक झाली की त्याला बदनाम केल जात ,त्यावर कार्यवाही केली जाते मग अश्या बिनबुडाच्या केंगडी डॉक्टर वर कार्यवाही का नाही असा संतप्त सवाल हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे.