लिंबागणेश येथिल शुज सेंटर, वेल्डिंग दुकान आगीत भस्मसात, गाव बंदीमुळे आग आटोक्यात येण्यास उशीर

लिंबागणेश येथिल शुज सेंटर, वेल्डिंग दुकान आगीत भस्मसात, गाव बंदीमुळे आग आटोक्यात येण्यास उशीर 
----------------------------------------
(बीड जिल्हा प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
लिंबागणेश येथिल श्रीगणेश शुज सेंटर व ईश्वरभारती वेल्डिंग दुकानाला दुपारी सव्वा दोन च्या दरम्यान शार्टसर्कीट मुळे आग लागली, चंद्रकांत यांच्या मालकीच्या शु सेंटर मध्ये अंदाजे ३ लाख रुपये किंमतीची व महत्वाची कागदपत्रे जळुन खाक झाली.
शुज सेंटर लगतच दादा कोळपे यांच्या मालकिच्या " ईश्वरभारती वेल्डिंग दुकानाला" आग लागुन वेल्डिंग मशिनचे अंदाजे सव्वा लाख रपयांची हानी झाल्याचे दादा कोळपे यांनी सांगितले.
   
दुकाने बंद असल्याने मोठे नुकसान, आग विझवण्यास अडचण :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
------------------------------------------------------------------------------- लिंबागणेश येथे दि. २ सप्टेंबर रोजी ५ कोरोना बाधित रुग्ण आढळले त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कंटेन्मेंन्ट झोन जाहीर करून गावबंदी करण्यात आली.त्यामुळे सर्व दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे लवकर दुकानाला आग लागलेली कळालेच नाही,तसेच ईतर दुकाने हाटेल्स बंद असल्याने आग विझवण्यासाठी पाणी मिळण्यासाठी धावपळ झाली.शेवटी पिण्याच्या पाण्यासाठी आणलेल्या जारमधिल पाण्याने आग विझवण्यात आली. आग आटोक्यात येण्यासाठी दिडतास लागला. डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांनी मंडळ अधिकारी जायभाये यांना फोनवरून कळवले व स्थळपंचनामा करण्याची विनंती केली.