लिबांगणेश सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीची गाव तेथे शाखा स्थापन करणार--गणेश वीर
(बीड प्रतिनिधी)बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिबांगणेश सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीची गाव तेथे शाखा स्थापन करणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे लिबांगणेश सर्कलचे युवा नेते गणेश वीर यानी व्यक्त केले आहे
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कुण्या एका जातीचा नसुन हा पक्ष समस्त बहुजन समाजाचा असुन युवकांनी प्रस्थापीत पक्षात कार्यकर्ता म्हणुन मिरवण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीत नेता म्हणुन मिरवुण आपला स्वाभीमानी बाणा दाखवावा आज घडीला महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भुमिका वंचित बहुजन आघाडी निभावत असुन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गोरगरीब,दीन दलीत,आदीवाशी ,शेतकरी,
कष्टकरी,शेतमजुर,उसतोड कामगार,आलुतेदार बलुतेदारांना सोबत घेवुन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढ्ढा देणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा असुन लवकरच बालाघाटावरील लिबांगणेश सर्कलमध्ये गाव तेथे शाखा स्थापन करणार असल्याचे मत लिबांगणेश सर्कलचे युवा नेते गणेश वीर यानी व्यक्त केले आहे