सफाई कामगारांसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरू  #अनिल #डोंगरे


(बीड जिल्हा प्रतिनिधी--विवेक कुचेकर)आज दिनांक 07 सप्टेंबर 2020 पासून अंबाजोगाई नगर परिषद अंतर्गत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद करत ते सुरळीतपणे चालू करण्यासह विविध मागण्यांसह  बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत . या सफाई कामगारांना साथ देत वंचित बहुजन आघाडीतर्फे बीड  जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्यामार्फत मुख्याधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले असून सदरील सफाई कामगारांच्या वेतन , निवाह भत्ता , विमा , covid 19 काळातील मानधन , संपावर गेल्यापासून रुजू होईपर्यंत चे वेतन , कामगारांच्या महिन्याच्या पगारी शासकीय बॅंकेतून करण्यात याव्यात , या सर्व मागण्या मान्य करण्यात येऊन जनतेला दिवस रात्र सेवा देणाऱ्या covid 19 योध्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलेला आहे याप्रसंगी निवेदन सादर करताना बीड जिल्हाध्यक्ष अनिल  डोंगरे , ख्वाजामियाँ पठाण , जांबुवंत तेलंग , ऍड . जाधव , रत्नदीप सरवदे , बाबासाहेब मस्के यांच्यासह लखन वैद्य , विशाल कांबळे , अमोल हातागळे , लक्ष्मण कसबे , अजय गोरे , नितिन सरवदे , अनिल कांबळे , व इतर कार्येकर्ते उपस्थित होते ....