<no title>आज दशक्रिया विधी आहे,केवळ "कै.विलास भानुदास जाधव" यांचा नव्हे तर जिल्हा कोव्हीड रूग्णालयातील "वैद्यकीय अनास्थेचा" माझे पापा पण या  सिव्हिल मुळेच गेले :- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर

आज दशक्रिया विधी आहे,केवळ "कै.विलास भानुदास जाधव" यांचा नव्हे तर जिल्हा कोव्हीड रूग्णालयातील "वैद्यकीय अनास्थेचा" माझे पापा पण या  सिव्हिल मुळेच गेले :- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर
------------------------------------------------(बीड जिल्हा प्रतिनिधी--विवेक कुचेकर)कोरोनाच्या काळात संपुर्ण कुटुंबासह गोरगरीब कुटुंबांना घरपोच जेवण पोहोच करणा-या "कै.विलासराव भानुदास जाधव" यांचा आज दि. ०६/०९/२०२० रविवार रोजी सकाळी ८ वाजता राक्षसभुवन ता.गेवराई जि.बीड येथे " दशक्रिया विधी" आहे ,आज केवळ त्यांचाच नव्हे तर बीड जिल्हा कोव्हीड रूग्णालयातील" वैद्यकीय अनास्थेचा" सुद्धा दशक्रिया विधी आहे कारण गोरगरीबांना अन्नछत्र आज आपल्यात नाहीत, न्युमोनियामुळे आजारी असलेले
 विलासराव जाधव यांचा मृत्यु सुद्धा वैद्यकीय अनास्थेचा बळी आहे, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी लक्ष देत नाहीत,मी स्वत: ८ दिवस माझ्या डोळ्याने बघितले आहे. डॉ.गणेश ढवळें सर , तुम्ही जे सध्या बोलताय ना ते जिल्हा रुग्णालयातील असुविधा बाबत ते खरे आहे, कारण माझे पापा या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय असुविधेमुळेच गेले.


   अन्नदुत"कै. विलासराव जाधव " संकल्प ग्रुपच्या माध्यमातून भुकेल्यांना गोरगरीबांना  दोन वेळचे जेवण 
------------------------------------------------ लाकडाऊनच्या काळात संकल्प ग्रुपच्या माध्यमातून अनेक भुकेल्या लोकांना दोन वेळचे अन्नाचे दोन घास भरवणारे अन्नदुत कै.विलासराव भानुदास जाधव , यांचा दि. २८/०८/२०२० रोजी मृत्यू झाला,८ दिवस जिल्हा कोव्हीड रूग्णालयातील मृत्युशी दिलेली झुंज अपयशी ठरली, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय असुविधेमुळेच,अनास्थेमूळे, वैद्यकीय अधिकारी यांच्या निष्काळजीपणा मुळे या जिल्हा रुग्णालयामुळेच माझे पापा गेले, डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर तुम्ही जिल्हा रुग्णालयातील मांडलेले वास्तव खरे आहे,मी आठ दिवस माझ्या डोळ्याने पाहीलंय ही खंत बोलुन दाखवुन मनावरचं ओझं थोडं हलकं झाल्याचं लेकीने सांगितलं, म्हणुनच म्हणतोय आज दशक्रिया विधी केवळ  " अन्नदुत कै. विलासराव भानुदास जाधव" यांचा दशक्रिया विधी नसुन जिल्हा रुग्णालयातील असुविधा वैद्यकीय अनास्थेचा सुद्धा दशक्रिया विधी आहे.