चौसाळा शहरात  लॉकडाऊन विरोधात वंचितचे आंदोलन

चौसाळा शहरात  लॉकडाऊन विरोधात वंचितचे आंदोलन
(बीड प्रतिनिधी)बीड तालुक्यातील चौसाळा शहरात  वंचित बहुजन आघाडीकडून  आंदोलन करण्यात आले.  प्रा,शिवराज बांगर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विवेक  कुचेकर यांच्या उपस्थितीत व्यापारी, छोटे दुकानदार यांना लॉकडाऊनच्या विरूध्द सर्व व्यवहार चालू ठेवावेत असे आवाहन केले. त्याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.


चौसाळा  येथील वंचित बहुजन आघाडीचे विवेक कुचेकर, प्रकाश ढोकणे ,रोहीत जावळे,गणेश चव्हाण,प्रताप सांळुके,शंकर रूपवते,गुलाब कांबळे,बापु काळे,गायकवाड ,प्रेम तुपारे,आमोल जावळे,देवेद्र आहीरे,
सतिष चव्हाण  यांनी व्यापाऱ्यांना व्यवहार चालू ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन त्यांनी आपला दैनंदिन जीवनातील व्यवहार चालू ठेवला. 


वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी कोरोनाच्या 
नावाखाली छोट्या व्यवसाईकांचे उद्योग धंदे बंद असल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी अन्यथा आम्ही लॉकडाऊन पाळणार नाही, असा इशारा दिला होता. त्या पाश्वभूमीवर या पुढे आमचे व्यवसाय बंद करणार नाही असे व्यापारी व दुकानदार यांनी सांगीतले. बाळासाहेबांच्या आवाहनाला जिल्ह्यत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा,शिवराज बांगर पाटील यांनी सांगीतले.