#तांगडे जी,माझ्या सारख्या सर्वसामान्य डॉक्टरला तुमच्या सेवेची संधी मिळतेय हे माझे भाग्यच.- प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ.राजकुमार निरगुडे.(जिल्हा शासकीय रुग्णालय बीड.) ::::::::::: तुम्ही दिन-दुबळे,वंचित,कष्टकरी आणि गोर-गरीबांची सेवा करा आम्ही तुमची सेवा करतो. :::::::::::::::: :::::-------- "गेल्या तीन दिवसा पासून व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे माझ्या डोळ्यांना खुपचं वेदना होत होत्या आणि त्यामधून सारखे चिकट पाणी येऊन खाज सुटली होती. यावेळी मी मेडिकल मधून डोळ्यात टाकण्यासाठी एखादा ड्रॉप किंवा औषध घेता येईल यासाठी बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णायातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ.निरगुडे साहेबांना फोन करून एखादे औषध सांगण्याची विनंती केली असता,त्यांनी क्षणाचा हि विलंब न करता मला सांगितले की,तुम्ही अजिबात मेडिकल मधून औषधे घेऊ नका. मी स्वतःतुमच्या घरी तुमच्या चेकअप साठी येतो,मी त्यांना सांगितले की डॉक्टर साहेब तुम्ही येण्याची अजिबात आवश्यकता नाही,एखादे औषध वैगेरे सांगा,या ऊपर डॉ.निरगुडे नी सांगितले की,तुम्ही सतत अडचणीत सापडलेल्या गोर-गरीबांच्या रात्री-अपरात्री मदती साठी धाऊन जातात याच बरोबर त्याची "जात" न पाहता त्याला प्रथमतः मदत करतात. .......... त्यामुळे या निमित्ताने मला तुमच्या सेवेची संधी मिळतेय हे काय कमी नाही. ....... :::::::::: आणि डॉ.निरगुडे हे फक्त पाऊण तासात माझ्या घरी त्यांची गाडी घेऊन पोहचले. :::::: ---------- ते फक्त पोहचलेच नाही तर त्यांनी येता वेळी स्वतःसोबत आवश्यक असणारे सर्व मेडिकल (ड्रॉप,औषध आणि गोळया) घेऊन आले. ::: सांगायचे तात्पर्य ऐवढेच की "कोरोना" सारख्या आजाराने संपूर्ण देशभर थैमान घातलेले असताना देखील आपली शासकीय सेवा करून इतरांना घर पोच सेवा देणारे आपल्या देशात खूप दुर्मिळ डॉक्टर आहेत. (डॉ.राजकुमार निरगुडे वॉल वरून.) "डॉ.राजकुमार निरगुडे":-शासकीय जिल्हा रुग्णालय बीड. #जय भीम#. #जय शिवराय#.
|