----------------------------
-------------------- (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)आज दि. २ आगस्ट २०२० वार रविवार रात्री १० वा. २३ मिनिटे केज
तालुक्यातील मौजे पिसेगाव कोव्हीड सेंटर येथुन बोलतोय... माझे नाव...... गाव.....सध्या राहणार परळी ,वय ५४ वर्षे , मी महावितरण मध्ये २२ वर्षे नोकरी करत आहे, माझे नाव पेपरमध्ये जाहीर करा आणि माझा मोबाईल नंबर पण त्यात नमुद करा. मी कोणालाही भित नाही,
टीप :- नाव छापता येत नाही त्यामुळे.....
निकृष्ट दर्जाचे जेवण,सकाळचेच जेवण संध्याकाळी' , दोन्ही हातानी चपाती तुटेना
-------------------------------------------
दि. ३१ जुलै २०२० रोजी परळी येथून दुपारी १२ वा. रूग्णवाहिकेत १४-१५ लोकांना घातले, तर.यात ५-६ महिला होत्या एक गरोदर होती.तीला अंबेजोगाई येथे हलवले. आम्ही सकाळी ३ वा १५ मिनिटे केज तालुक्यातील मौजे पिसेगांव येथिल कोव्हिड सेंटरमध्ये पोहचलो. आज सकाळी सकाळी ९ :३० वा. प्लेट मध्ये पोहे मिळाले,चहा मिळालाच नाही, मग चहा विषयी विचारणा केली असता सकाळी ११:३० वा. चहा मिळाला. दुपारी १ वा २ चपात्या, बटाट्याची भाजी, साधाभात-वरण दिले.
निकृष्ट दर्जाचे जेवण , चपाती दोन्ही हातानी तुटत नाही, सकाळचीच पोळी आणि भाजी आज रात्रीला दिली आहे. वैद्यकीय अधिकारी यांना तक्रार केली तर ते म्हणतात वरिष्ठ शासकीय अधिकारी यांनी जेवणाचे कंत्राट दिले आहे. आम्ही काय करणार?? ईतर कर्मचारी म्हणतात आम्हीच ५०० रु रोजावर काम करतोय , तुमचं तेच आमचं
.
डॉ.केंद्रे , वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय केज, :- वरिष्ठ पातळीवरून सोय झाली की तुम्हाला देऊ
----------------------------------------------- डॉ. केंद्रे, दिवसातुन एकदा कोरोना वार्ड मध्ये चक्कर मारतात. काल रात्री ८:३० वा. आल्या होत्या,आज आल्याच नाहीत, सकाळी गरमपाणी मिळतच नाही, जेवणाचे हाल, याविषयी डॉ.केंद्रे यांना तक्रार केली असता वरिष्ठ स्तरावरून जे उपलब्ध असेल ते देण्याचं काम सुरू आहे. ईतर असुविधा हळूहळू दुर करायचा प्रयत्न केला जाईल.
ReplyForward |