नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने आज कोरोना प्रकोपात लॉकडाऊन मुळे हवालदिल झालेले नवी मुंबई शहरातील नागरिक व सोबत जोडत असलेल्या पत्रातील नमूद सर्वच घटकांच्या असलेल्या विविध समस्या व मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बेलापूर पर्यंत काढण्यात आलेल्या लॉन्ग मार्च पदयात्रेस ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार मा.श्री. गणेशजी नाईक साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून या जनआंदोलंनास पाठिंबा दर्शविला आणि संस्थेस व नवी मुंबईकर नागरिकांना आश्वासित केले कि, आज काढण्यात येणारा लाँग मार्च पदयात्रा हि तात्पुरती स्थगित करावी जेणे करून कोरोना प्रतिबंध काळात कायदा व सुव्यवस्थेचे व नियमांचे उल्लंघन पदाधिकाऱ्यांनी करू नये, संस्थेच्या वतीने मा.गणेशजी नाईक यांनी मा. कोकण आयुक्त, महापालिका आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक, मा.अधीक्षक अभियंता-MSEDCL यांना देण्यात येणारे नागरी समस्यांचे निवेदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत यांचे कडून स्वीकारले व या समस्यांचे त्यांच्या स्तरावर निराकरण करून नवी मुंबईकरांना दिलासा देण्याचे आश्वासित केले. या लाँग मार्च पदयात्रेत नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत हे सहभागी होते. यावेळी मा.अधीक्षक अभियंता -MSEDC श्री. माने साहेब यांनी लाँग मार्चच्या सुरुवातीसच छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे निवेदन स्वीकारले.
सोबत सदर कार्यक्रमाचे फोटो जोडण्यात आले आहे, तरी या जनहितार्थ आयोजित लॉन्ग मार्च पदयात्रेच्या कार्यक्रमास सचित्र