कोरोना आणि सुरक्षा व आपली जबाबदारी ....डॉक्टर जितीनदादा वंजारे*

कुचैकर बिड: *

      बीड प्रतिनिधी :-आज दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.जगभर कोरोना चे थैमान आहे.भारतात इतर देशापेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे आपल्या महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे आपल्या बीड जिल्ह्यात बघता बघता हजाराच्या वर रुग्ण संख्या झाली .कोरोना हा थांबणार नसल्याच चित्र स्पष्ट होताना दिसतंय.कोरोना ने काल तर एका दिवसात सेनचूरी मारली, दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपणच काळजी घेण्याचा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो.यामध्ये आयुर्वेदिक उपचार फार महत्वाचे आहेत असे मला वाटते कारण जेकि आपण घरी पण करू शकतो यामध्ये आपण जलनेती,पाण्याची वाफ,बाजरी च्या पिठाची वाफ,झंडू बाम ची वाफ,नेबूलायझेशन ,योगा,प्राणायाम आयुर्वेदिक वनस्पती आदीचे सेवनाणे पण रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतो यामध्ये होमीओपैथि चे औषधं वापरू शकतो.खूप छान परिणामकारक औषधं आहेत जेकि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.जसेकि आरसेनिक अल्ब- 30,कॅमफोरा-200,ब्लाटा ओरिएं-200,डलकामारा-30 अशी अनेक औषधं फ्लू मध्ये छान काम करतात.आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात असे  मत होमीओपैथीचे तज्ज्ञ डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.

          त्याच बरोबर आपण वारंवार सानिटीझर स्प्रे,अँटी मायक्रोबीयंट,साबण ,लिक्विड वापरून हात,पाय तोंड व पूर्ण शरीर धुवून काढले पाहिजे.वेळोवेळी अंघोळ करायला पाहिजे,हेल्थ कर्मचाऱ्यांनी दिवसातून कमीत कमी चार ते पाच वेळा स्वच्छ अंघोळ करायला पाहिजे,लिंबूपाणी,संत्री मोसंबी ज्यूस,फळांचा रस,हिरव्या पालेभाज्या,फळे,मोड आलेले कडधान्य खायला पाहिजेत.दिवसातून तीन ते चार वेळा जेवण करायला पाहिजे कारण उपाशी पोटी संसर्ग जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दररोज व्यायाम,प्राणायाम व योगासन करायला पाहिजेत.सकाळी उठून धावने,चालणे,मोकळ्या हवेत प्राणायाम करणे आरोग्यदायी ठरेलं.आपले हात तोंडाला न लावणे,नाकाला न लावणे,नखें तोंडात न घालणे या सवयी लावायला पाहिजेत ,मास्क वापरायला पाहिजे.वारंवार गरम व घशाला पोळेल इतपत गरम,कोमट पाणी,मीठपाणी,लिंबू टाकून डीकाशीन चहा,लिंबू शरबत,पिणे आरोग्यदायी ठरेलं,वारंवार साबनाणे तोंड धुणे,संपर्क टाळणे,दुरूनच बोलणे इत्यादी काळजी घेतली पाहिजे.शोषल डिस्टन्सिंग पेक्षा स्वतःची काळजी घेऊन स्वतः दूर राहिलेले बरे.तंबाखू बिडी सिगारेट इत्यादी वस्तू इतरांच्या खाऊ नये व आपल्याही दुसऱ्याला देऊ नये यानेच जास्त प्रादुर्भाव वाढतो आहे.मुळात या गोष्टीचे सेवन टाळावे त्या आरोग्यlस हानिकारक आहेत.अती थंड वस्तू खाऊ नयेत.शुद्ध अण्ण ,जास्त शिजलेले ,सकस आहार घ्यावा.बदल हा स्वतःपासून करावा लोकांना हे कर ते कर म्हणून वेळ वाया घालवणन्यापेक्षा आपल्या पासून सुरुवात करावी.आपण कोरोनाला नक्कीच हरवू  फक्त गरज आहे ती स्वतःत बदल करण्याची.

       *कोरोना पासून संरक्षण साठी चा आहार व विहार काय करावा*

1)पिवळ्या सालीची फळे खावीत

2)व्हिटॅमिन सी युक्त गोळ्या खाव्यात

3)केळी,संत्री,मोसंबी,आंबे,लसूण ,लिंबू,आवळा इत्यादी फळे खावीत

4)मल्टी व्हिटॅमिन च्या गोळ्या,व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स च्या गोळ्या टॉनिक घ्यावे.

5)घरामध्ये डॉक्टरच्या सल्याने आरसेनिक अल्बम 30,,कॅमफोरा-200, पारासीटामॉल,डेक्सामीथाझोन,व्हिटॅमिन सी,मल्टि व्हिटॅमिन च्या गोळ्या,आस्थालीन च्या गोळ्या,डेरीफायलीन च्या गोळ्या,वाफ घेण्यासाठी नेबूलायजर ,कफ सायरप गरज पडल्यास ऑक्सिजन असायला पाहिजे.

   *हे करू नका*

1)अती गरज पडल्यास बाहेर पडा नसता घरातच राहा .गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.गर्दी करू नका.

2)अफवा पसरू नका ,अफवेला बळी पडू नका.सत्यता जाणा आणि त्यावर विश्वास ठेवा.

3)आरोग्य यंत्रणा ने दिलेले सर्व नियम पाळा,काळजी घ्या.मास्क वापरा.मोकाट फिरू नका पोलिसांना सहकार्य करा.

4)हस्तादोलन करू नका,मिठी मारू नका ,दुरूनच बोला संपर्क टाळा.

5)अती ताप,खोकला,घशात खवखव ,घसा दुःखी,कोरडा खोकला,स्वास घ्यायला त्रास असल्यास तात्काळ डॉक्टराणा भेटा.तपासणी करून घ्या .लाजू नका ,भिऊ नका.

6)उघडे अण्ण,शिळे अण्ण,बाहेरून आल्यावर हाथ न धुता जेवण करू नये,बाहेरून आल्यावर हाथ पाय तोंड स्वच्छ साबनाणे  धुवून घ्यावे व नंतरच जेवण करावे.

       कोरोना हा एक फ्लू आहे पण याचा बाऊ मोठ्या प्रमाणात झाल्या कारणाने जनसमुदायात खूप भीतीचे वातावरण तयार झाले आहे पण  भिऊन चालणार नाही आपल्याला त्याबरोबर एकत्रितपणे  लढावे लागणार आहे.कोरोना थांबनार नाही त्याला योग्य पद्धतीने इराडिकेट करावे लागणार आहे.त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढवून आपण यावर उपाय मिळवू शकतो.बीपी,शुगर,सी.ओ.पी.डि.,दमा,टीबी इत्यादीच्या रोग्यांनी घाबरून न जाता योग्य डाक्टरच्या सल्ला घेऊन लवकर उपचार घ्यावेत.या काळात व्यसन कोणतेच करू नये.योग्य आहार घ्यावा.आपल्या परिसरात जर कोरोना रुग्ण आढळ्यास आरोग्य संघटनेला सहकार्य करून स्वतःचा swab तपासणी साठी द्यायला विसरू नका,कारण हा रोग झापाट्याने वाढतो आहे यावर वेळीच अंकुश ठेवला तर मोठी हानी आपण वाचवू शकतो.आपली कर्तव्य आणि जबाबदारी पाहून गावातील डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्यां ,आरोग्य अधिकारी यांना सहकार्य करा उस्फुर्त पुढे या तपासणी करून घ्या आणि समाजाला संसर्ग होण्यापासून वाचावा.आरोग्य कर्मचारी आपले मित्र आहेत त्यांना हानमार किंवा दमदाटी करू नका ते तुमच्या भल्यासाठीच काम करतात हे लक्षात असू द्या आणि घरीच थांबा,बाजार,गर्दी,मॉल,शहर इत्यादी ठिकाणी जाऊ नये.हे वर्ष फक्त जगून घ्यायला पाहिजे.पैसा घरदार,नौकरी यापेक्षा आपली मानस आपले कुटुंब आपली नाती व्यवस्थित जपले पाहिजे आनंदी जगून घ्या बाकीचे नंतर पाहू.पूर्ण आयुष्य कमवायला पडले आहे आपण आत्ता या क्षणी फक्त आनंदी जगा.निसंकोच पणे डॉक्टराणा होणारा त्रास सांगा,काही लोक लक्षणे सांगत नाहीत आणि त्यामुळे संसर्ग वाढतो आहे