कुचैकर बिड: महावितरणचा अनागोंदी कारभार, विद्युत तारा जमिनीपासून ४ फुटावर शेतक-याच्या रानात भितीपोटी मजुर येईनात :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

[13:18, 12/07/2020]
-----------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) बीड तालुक्यातील मौजे बेलगांव येथील शेळके वस्तीवरील शेतात महावितरणच्या तारा अगदी जमिनीपासून ४ फुट ऊंचीवर असुन जिवाच्या भितीपोटी मजुर कामावर येईना झालेत, महावितरणचे  लाईनमन घरत यांना तक्रार केली असता तुम्ही पैसे गोळा करून काम करून घ्या असे सांगितले जाते.वारंवार तक्रार दाखल करण्यात येऊन सुद्धा   लोंबकळणा-या  विद्यूत तारा दुरूस्ती केली जात नाही.


राणी / पार्वती शेळके :- पावसाळ्यात वीजकरंट लागुन जिवितहानी होण्याची भिती जास्त वाढली आहे
-------------------------------------------------------------------------
वर्षभरापासून लोंबकळणा-या विजतारा मुळे शेतात मजुर कामाला येत नाहीत. पावसाळ्यात जमिनीला ओल असल्यामुळे जिवितहानी होण्याची भिती वाटते म्हणून कामावर मजुर येत नाहीत, रात्री अपरात्री,जनावर सुटले अथवा घराला चिटकुन लोंबकळणा-या तारा असल्यामुळे भिती वाटते, महावितरण कर्मचारी यांना सांगुन कंटाळुन गेलो आहोत.


सतिश शेळके :- लाईनमन म्हणतात तुम्ही पैसे गोळा करून काम करून घ्या , मग पगार कशाचा घेतात
------------------------------------------------------------------------------
 येथिल महावितरणचे लाईनमन घरत यांना याविषयी वारंवार तक्रार केली आहे, परंतु घरत म्हणतात,मला पोलवर चढता येत नाही, तुम्ही पैसे गोळा करून काम करून घ्या, जर आम्हा शेतक-यांनाच काम करून घ्यायचे असेल तर मग लाईनमन पगार कशाचा घेतात असा संतप्त सवाल केला.


डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :- ऊर्जामंत्री नितिन राऊत यांना जिल्हाधिकारी मार्फत लेखी तक्रार
------------------------------------------------------------------------------
पावसाळ्यापूर्वी लोंबकळणा-या विद्युत तारा दुरूस्ती करणे, ताराला चिकटणा-या झाडांच्या फांद्या साळणे, वाकलेले पोल सरळ करणे याविषयी वारंवार निवेदने दिली आहेत, तसेच रास्ता रोको आंदोलन, धरणे आंदोलन करण्यात आले होते, आठ दिवसांपुर्वी या महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे गांधीगिरी आंदोलन करण्यात येऊन उपभियंता विजय हुरकुडे यांच्या महावितरणच्या कार्यालयातील खूर्चीला पुष्पहार घालण्यात आला होता व उपस्थित कर्मचारी यांना फुल देऊन निवेदन देण्यात आले होते.परंतु एखादा बळी गेल्याशिवाय महावितरण ठिकाणावर येईल असे वाटत नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री नितिन राऊत, ग्रामविकास मंत्री, तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.