#बीड, माजलगाव तालुक्यातील देपेगाव येथील बौद्ध असलेले सोनाजी घडसे यांच्यावर जातीयतेतून हल्ला झाला आहे. शेतात एकटं घरं असलेलं, आणि गावातील जातीयवाद्यांनी त्याच्या घरासमोर अवैध वाळू टाकली. रात्री बेरात्री ट्रॅक्टर-ट्रक च्या आवाजाने त्याला रात्रभर जाग राहावं लागतं होतं, त्याची चूक एवढीच की त्याने त्यांना विनंती केली की, या वर्दळीचा माझ्या परिवाराला त्रास होतो तुम्ही दिवसा वाळू टाकली तर बरं होईल. एव्हढ्यामुळे महारग्या धेडग्या औकातीत रहा, मी या गावचा पाटील आहे, मला शहाणपणा शिकवतोस का म्हणून काळे नामक जातीयवाद्यांनी त्याला मारहाण केली.
सोनाजी केस करायले गेले पण बायका लेकरं घाबरले होते. पुन्हा असं होणार नाही म्हणून हे प्रकरण दडपले गेले. 4 दिवसांनी सोनाजी घडसेच्या घरापासून 100 मीटर अंतरावर टाकलेली वाळू तहसीलदाराने जप्त केली, त्याचा ठपका सोनाजी घडसेवर ठेऊन सोनाजी घडसेला जीवे मारण्याची धमकी देत ही वाळु दीड लाखाची होती ते अन्यथा तुला मारून टाकू अशी धमकी दिली.
गुंडप्रवृत्तीचे लोक असल्यामुळे घडसे कुटुंब घाबरले आहे. त्यांनी माजलगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेनी त्यांना धीर देऊन पोलीस यंत्रणेशी संपर्क केला आणि या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.
अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला परन्तु हा गुन्हा मागे घेण्यासाठी व एफआयआर मधून काही नावं मागे घेण्यासाठी सोनाजी घडसेला पुन्हा तुला आता मारूनच टाकतो. यातील आरोपी गुंड प्रवृत्तीचे आहेत म्हणून घाबरलेल्या सोनाजीने परिवाराला घेऊन दपेगाव सोडलं आणि रात्रभर पोलीस स्टेशनला काढला. सोनाजीने बायको पोरं नातेवाईकांकडे सोडून निघून गेला आहे. दबाव एवढा वाढलाय की, तो जीव वाचवण्यासाठी भटकत आहे.
आम्ही त्यांच्या संपर्कात असून पोलीस निरीक्षक पाटील यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ते म्हणतात त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही माणूस मारल्यावर ते संरक्षण देणार का? रक्षणासाठी न्याय मागितला जातो, संरक्षण देणारी यंत्रणाच आटोपीशी मिळून न्यायाच्या आणि कायद्याची हत्या करीत आहे.
बीड जिल्ह्यात एका पाटोपाट एक घटना घडत आहेत. स्थानिक आमदार, बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री हे दलित अत्याचार घटनांची दखल घेत नाहीत. हे सरकार आमच्या बौद्ध अत्याचारावर बोलत नसेल तर हे सरकार आमचं नाही.
सोनाजी घडसे गाव सोडून जीव मुठीत धरुन पळतोय त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावे आणि आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात. बौद्धांची हत्या झाल्यावरच यंत्रणा जागी होणार आहे का?
(पीडित : सोनाजी घडसे 09689796643)
#दलितअत्याचारथांबलेचपाहिजे
#गृहमंत्रीहोशमेंआयो