लाॅकडाऊन आदेशाचे पालन न करणे पडले महागात. पनवेल दि.9.7.20


 


पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लाॅकडाऊन घोषित केला आहे. साथ रोग अधिनियमाच्या प्राप्त अधिकारानुसार आदेशाचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
   उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चारही प्रभाग समिती मध्ये एकूण रक्कम रुपये 1,33,600/ मात्र दंड वसूल करण्यात आलेला आहे.
यामध्ये मास्क न घालता फिरणे, सोशल डिस्टंसिंग पालन न करणे, लाॅकडाऊन आदेशाचा भंग करून अनावश्यक वाहनावर फिरणे, विहित प्रवाशांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करणे अशा कारणांमुळे खालीलप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे.
 प्रभाग अ समिती 32400 
प्रभाग समिती ब 7500
प्रभाग समिती क 26800
मग समिती 66, 900
अशी एकूण दंडाची रक्कम रुपये 1,33,600 /मात्र वसूल करण्यात आली


खालीलप्रमाणे संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या प्रभागात आपल्या अधिनस्त कर्मचारी घेऊन आयुक्तांच्या आदेशानुसार लाॅकडाऊनचे पालन न करणा-या नागरिकांवर स्थानिक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे अधिपत्याखाली दंडात्मक कारवाई करत आहेत.



अ प्रभाग खारघर :-


1.श्री.भंडारी व श्री. भगवान पाटील व
2. ग्रामीण साठी श्री. हरिश्चंद्र कडू यांची दोन पथके .


ब प्रभाग कळंबोली :-
1.श्री.प्रकाश गायकवाड व
2. श्री. राहूल जाधव व श्री. रमेश पाटील यांची दोन पथके.


क प्रभाग कामोठे:-
1. श्री. अरूण कोळी व 2. श्री. तांडेल व श्री.पाडवी यांची दोन पथके.


ड प्रभाग पनवेल:-
1.श्री. कवठे व श्री.अमीर घोलप व
2. श्री.नवनाथ थोरात & श्रीमती विनया म्हात्रे व श्री.राजेश डोंगरे यांची दोन पथके


याप्रमाणे सर्व प्रभागात स्थानिक पोलीस यांचे सहकार्याने कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.