राजगृहावर समाजकंटकांकडून झालेल्या हल्याचा वंचित बहुजन आघाडी बीडच्या वतीने जाहीर निषेध--- सचिन मेघडंबर
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जागतिक प्रतिभेची केवळ पुस्तकांसाठी उभारलेली वास्तू आज जग विख्यात आहे.
दिनांक 7 जुलै रोजी ह्याच वास्तूवर काही समाजकंटकांनी घाला घालण्याचा प्रयत्न केला व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला.
महाराष्ट्र आज जातीय वादाच्या भयचक्रातून जात असताना तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ह्या समाज कंटकांनी वैश्विक राजगृहावर हल्ला केला.
सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धनगर जवळका याठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करण्यात आला. धनगर जवळका मधील वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांची भावना ही होती की राजगृहावरील हल्ला हा आमच्या अस्मितेवर आहे परिणामी आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरायला तयार आहोत.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्ह्याचे महासचिव सचिन मेघडंबर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना असे सांगितले की राजग्रह वरील हल्ला जातीयवादी मानसिकतेतून झालेला हल्ला आहे यामुळे ह्या मानसिक रोग्यांना चोवीस घंटया मध्ये अटक नाही झाली तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
व या घटनेचा त्रिव शब्दात आम्ही निषेध व्यक्त करत आहोत या प्रंसगी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हयातील अंसख्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते