सडलेल्या मनूचे वेडलेले मनुवादी ....डॉ.जितीनदादा वंजारे.


     बीड प्रतिनिधी---विवेक कुचेकर:- महाराष्ट्र म्हटलं कि विरप्रताप पुरंदर,श्रीमंतयोगी,राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी स्वराज्य उभारणेसाठी केलेला पराक्रम आणी हे महान राष्ट्र घडवणारे छत्रपती शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्पणातून घडलेला पुरोगामी महाराष्ट्र आपल्या डोळ्यासमोर येतो .अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एका माळेत गुंतून त्यांच्या रक्ताळू मनगटांना प्रेमाची झालर देऊन एकमेकांत राष्ट्रान जमवून सर्वांची अगदी सुरेख सांगड घालून स्वराज्य निर्माण करणारे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज आणी त्यांचा हा महाराष्ट्र . आया बहिणीवर अत्याचार करणाऱ्या तीनही जुलमी शाह्या नेस्तनाभूत करून मुजोर व कपटी  दुष्मनाच्या छाताडावर बसून आपले हक्क अन अधिकार अबाधित ठेवण्यासाठी स्वतःच मालकिच स्वराज्य निर्माण करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज खरंच आज तुमची गरज भासतेय.भेदाभेद करणाऱ्या मनुवादी गिधाडांना त्याकाळी तुम्ही चरा चरा कापल,बलात्कार करणाऱ्या नीच चौरंग्याला भर चौकात फाशी दिलीत त्याला ठेचून मारलात.दुसऱ्याच्या स्त्री ला साडी चोळी करून 'पर स्त्री माते समान' ही स्त्री सन्मानाची नांदी आपण लावलीत.पण आज महाराष्ट्रात अजब घडतयं इथे दलितांच्या स्त्रीयांवर अत्याचार केला जातोय,त्यांची नग्न धिंड काढली जातेय, त्याकाळच्या जश्या तीनही जुलमी शाह्या माजल्या होत्या पण तुम्ही त्या मोडीत काढल्या खरंच आज अगदी तसंच आत्ता घडायला हव आहे आणी यासाठीच आज तुमची नितांत गरज भासतेय महाराज आपण आत्ता पाहिजे होतात आज दलित, शोषित, पीडित समाजाला पूर्वी प्रमाणेच जुलूम सहन करावा लागतोय.आजही भयानक जातीयता आहे इथे आज जर तुम्ही असता तर हे नक्कीच घडलं नसतं आणी आज तुम्ही असतात तर आमची अस्मिता व आमच ऊर्जास्थान 'राजगृह'अबाधित असत.कोणाची मजल झाली नसती तिथे जाऊन दगड मारण्याची आणी कुंड्या पाडण्याची महाराज आज खरंच आपण पाहिजे होतात ही विषमता घालवण्यासाठी........!
           हा महाराष्ट्र पुरोगामी आहे .पूर्वीची चांगली मानवतावादी संस्कृती जपणारा आहे .माणुसकी जपणार राष्ट्र आहे,हे महान असल्या कारणाने याला महाराष्ट्र म्हणतात, येथे संत गाडगेबाबा,संत रोहिदास,संत सेवालाल,संत नरहरी,संत तुकडोजी महाराज जन्मले हाच तो महाराष्ट्र जिथे  जगतगुरु  संत तुकोबा जन्माला आले हाच तो महाराष्ट्र जिथे संत चोखामेळा,संत नामदेव,संत ज्ञानेश्वर,संत जनाबाई,संत गोरोबाकाका,संत भगवान बाबा जन्मले .या सर्व संतांनी  वारकरी संप्रदयातून येथील लोकांना मानवता शिकवली,माणुसकी चे धडे दिले,'सर्व धर्म समभाव' शिकवला पण आज याच पुरोगामी  महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार, गरिबांवर अन्याय,शोषित-पिडीतांवर जुलूम होताना दिसतोय आज याच महाराष्ट्रात गुलामगिरी विरुद्ध बंड ठोककणारे,अस्पृश्यता पळवून लावणारे,जातीयता दूर करण्यासाठी अक्ख आयुष्य वेचणारे ,महामानव, बोधिसत्व,विश्वरत्न,परमपूज्य, कायदेपंडित,अर्थतज्ज्ञ ,ज्ञानाचा अखंड पंडित,'द फादर ऑफ मॉडर्न इंडिया',भारताचे शिल्पकार राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराला दगडफेक होतेय किती हा निंदनीय प्रकार ? अरे लाज वाटुद्या ज्या महामानवाच्या ज्ञानासमोर जगातील एकही पंडित टिकला नाही त्या सूर्याच्या घरावर दगड फेकले जातात कुंड्या फोडल्या जातात .षंड आहात तुम्ही ज्याही मनुवादी कुत्र्याने हे घडवून आणलं ना त्या बारबापी औलादी ला भर चौकात ठेचून मारला पाहिजे त्याचा शिरच्छेद केला पाहिजे .अरे ज्या महामानवाच्या तेज्याने आजही जळकुटे घाबरून त्यांची पुतळे फोडतात,विटंबना करतात त्याना हा पक्का आंबेडकरवादी मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर ठणकावून सांगतो कि 'भुरट्यानों तुमची कालही बरोबरी करण्याची औकात नव्हती आणी आजही बरोबरी करण्याची औकात नाही. सडक्या मनुवादी बैलांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये आणी तस कराल तर तुमच तोंड जळल्याशिवाय राहणार नाही यात तिळमात्र शंका नाही.जिसकी बराबरी करणे कि औकात नही होती वही बदनामी करते है ..... तुमची औकात दाखवून दिलीत तुमच्यानी साधी साधी कर्तबगारी होऊ शकत नाही तुम्ही बरोबरी काय करणार ?  आणी बरोबरी होत नाही म्हणून अशी कपट कारस्थान करता हे वेळीच थांबवा नसता येणाऱ्या भीषण परिणामांना सामोरे जा' असा इशारा दलित चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते  डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला."डेड आंबेडकर इज मोअर डेंजरस द्यान लाईव्ह" ह्या वाक्याचा प्रत्यय पाहिजे असेल तर तो योग्य वेळी देऊ.शासनाने वेळीच खबरदारी घेऊन संबंधित मनुवादी भडवे तात्काळ अटक करावीत नसता अख्खा  महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही कारण आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आम्ही कायदा आणी सुव्यवस्था मानणारे लोक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराणी घालून दिलेल्या वाचनाना समोर ठेऊन व राज्यघटनेचा सम्मान करून आम्ही आत्ता लॉक डाउन काळात शांत आहोत पण दिवसेंदिवस दलित अत्याचाराचं वाढत प्रमाण पाहता व आमच्या अस्तित्वाचा विचार करता वेळप्रसंगी आम्ही योग्य निर्णय घेऊ अशी तंबीही डॉक्टर जितीनदादा वंजारे यांनी यावेळी दिली.