----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या"राजगृह" परीसरात काल दि. ०७/०७/२०२० रोजी दोन अज्ञात व्यक्तीने तोडफोड केलेली असुन दगडफेक सुद्धा केल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिसत असुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विरोध करणा-या या प्रवृत्तींचा निषेध व्यक्त करत कायदा व सुव्यवस्था बिघडवु पाहणा-या अशा दुष्टप्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी लिंबागणेशकरांच्या वतीने डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या वतीने स.पो.नि. लक्ष्मण केंद्रे, नेकनुर ठाणे यांच्या मार्फत मा. हर्ष पोद्दार साहेब, पोलिस अधीक्षक बीड, मुख्यमंत्री उदृधवजी ठाकरे साहेब, गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड मा.धनंजय मुंडे , विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, सचिव, हिंद संस्था नेकनुर व शहादेव ढवळें उपस्थित होते.