सोलापूरच्या #नाभिक समाजाने #वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष #प्रकाश तथा बाळासाहेब #आंबेडकर यांचे मानले आभार

[20:02, 05/07/2020] कुचैकर बिड: 


(सोलापूर प्रतिनिधी--विवेक कुचेकर):- महाराष्ट्र राज्यातील तसेच सोलापूर शहरातील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नाभिक समाजाचा मुख्य व्यवसाय असणारा सलून सेंटर व ब्युटी पार्लर हे बंद होते दरम्यान लॉकडाऊन संपत असताना इतर व्यवसाय राज्य शासनाने सुरू केले परंतु नाभिक समाजाचा मुख्य व्यवसाय असणारा सलून सेंटर व ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती दरम्यान ही बाब वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांना समजताच
अकोला येथे  दिनांक 30 जून पर्यंत सलून सेंटर चालू न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर आंदोलन केले जाईल अशी घोषणा केली व 
 दिनांक 25 जून रोजी प्रकाश आंबेडकर हे सोलापुर दौऱ्यावर आले असता माननीय जिल्हाधिकारी व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी  चर्चा केली असता सोलापूर सह महाराष्ट्र राज्यातील सलून व्यवसायांना त्यांची  दुकान उघडण्याची परवानगी द्या अन्यथा  1 जुलै रोजी 
मी स्वतः दुकान उघडून  सलून  व्यवसाय चालू  करेन अशा पद्धतीचे प्रशासनाला बजावले असता 28 तारखेला सोलापूर शहरातील सलून सेंटर दुकान उघडण्याची परवानगी दिली त्याबद्दल सोलापूर शहरातील नाभिक समाजाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा निरीक्षक बबन शिंदे नाभिक समाजाचे  संतोष राऊत आनंद सिंगराल अक्षयकुमार कांती अनिल कोंडुर संतोष धोत्रे सिद्राम रुद्रार मोहन जमदाडे भास्कर तनमुर गोधर्वन कोडपाक प्रकाश शिंदे श्रीनिवास रासकोंडा राजकुमार मालतुमकर रोहित हळदे सह नाभिक समाजाचे  सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
[20:13, 05/07/2020] कुचैकर बिड: कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शासन सवलती देत असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातील खाजगी सावकारांची महिलांना वाढीव दराने व्याज वसुली करत दमदाटी, जिल्हा प्रशासनाने मदत करावी महिलांचा आक्रोश.., जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना लेखी तक्रार :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
------------------------------------------------ (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) शासनाने कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर नागरीकांना सवलती देण्याचे आवाहन केले असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम तालुक्यातील खाजगी सावकारांनी मात्र महिला बचत गटाच्या ४० महिलांना चक्रवाढ पद्धतीने व्याज वसुली करत दमदाटी करत वेठीस धरले आहे, त्यामूळे महिला त्रस्त असुन जिल्हा प्रशासनाकडे मदतीची याचना करीत आहेत.याप्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बीड यांना लेखी तक्रार दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
. उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम तालुक्यातील " भारत फायनान्सियल इनक्लुजन लिमिटेड" खाजगी कंपनीने बीड जिल्ह्यातील चौसाळा येथिल ४० महिलांच्या बचतगटाला २ रु.शेकडा दराने लघुउद्योग करणारे यांना कर्ज दिले आहेत. यामध्ये कोणी बांगड्यांचा व्यवसाय,तर कोणी शेळीपालन तर कोणी किराणा दुकान, तर कोणी मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतलेले आहे.त्यातील काही जणांनी मंगळसूत्र गहाण ठेवून कर्जहफ्त्याची परतफेड करत आहेत.   कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर ३ महिन्यांपासून   काम नसल्यामुळे त्यांना हफ्ते भरणे जड जात असुन त्यांनी सवलत मिळावी आणि चक्रवाढ पद्धतीने व्याज वसुली करू नये अशी विनंती केली आहे. परंतु कंपनीचे वसुली करणारे त्यांचे ऐकत नसून त्यांना दर मंगळवारी हफ्ते भरण्याचा तगादा लावला असुन धमकावले जात आहे, तसेच त्यांनी भरलेल्या हफ्त्यांची कुठलीही पावती दिली जात नाही, त्यामुळे महिला त्रस्त झाल्या असुन जिल्हा प्रशासनाने मदत करावी अशी याचना करीत आहेत.


विवेक कुचेकर:-वंचित बहुजन आघाडी,बालाघाट,तालूकाध्यक्ष
-----------------------------------------------  महिलांकडून सक्तीने चक्रवाढ व्याजाने वसुली करणा-या भारत फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कर्मचा-यांनी जबरदस्तीने अवाजवी वसुली चालु ठेवली तर वंचित बहूजण आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येईल , प्रशासनाने याची दखल घ्यावी.


डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर :- कायदेशीर कारवाई करावी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बीड यांना लेखी तक्रार
---------------------------------------------
यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बीड यांना लेखी तक्रार दाखल करत जबरदस्तीने अवाजवी व्याज वसुली करणा-या खाजगी सावकारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार मा.राहुलजी रेखावार, जिल्हाधिकारी बीड व मा.हर्ष पोद्दार पोलिस अधीक्षक बीड यांना केली आहे..