कर्तव्यदक्ष प्रामाणिक आधिका-याच्या मानसन्मानासाठी रस्त्यावर....राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे भ्रष्टाचार दडपण्यासाठी षडयंत्र , सामाजिक कार्यकर्ते हाणुन पाडणार :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
---------------------------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
कोरोनालढ्यासाठी ३३ कोटी आणि पंचायत समितीमधिल मनरेगा १७ कोटी अपहार दडपण्यासाठी, कर्तव्यदक्ष हर्ष पोद्दार यांच्यावर चिखलफेक, भ्रष्ट राजकारणी आणि प्रशासकीय आधिका-यांचे बदनाम करण्याचे षडयंत्र, बीडकर प्रामाणिक आधिका-याच्या मानसन्मानासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, आरोग्य मंत्री, रोहयो मंत्री, ग्रामविकास मंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
------------------------------------------------ सविस्तर माहितीसाठी:- बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आरोग्य विभागाला मिळालेले ३३कोटी भ्रष्टाचार आणि बीड पंचायत समिती मनरेगा अंतर्गत १७ कोटी रुपये अपहार प्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई कर्तव्यदक्ष मा.हर्ष पोद्दार साहेब, पोलिस अधीक्षक बीड यांनी करू नये, त्यांच्या दबावाखाली पोद्दार साहेब काम करत नसल्यामुळे त्यांना बदनाम करून त्यांची बदली करण्यात यावी यासाठी रचलेले हे षडयंत्र असून आम्ही सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून प्रामाणिक अधिका-यांच्या मानसन्मानासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, पोलिस महासंचालक, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मा. राहुलजी रेखावार साहेब जिल्हाधिकारी बीड आणि मा. हर्ष पोद्दार साहेब पोलिस अधीक्षक बीड यांच्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला बीडकरांनी सलाम केलेला आहे. बीड पोलिस दलातील २९ पोलिस कर्मचारी व अधिकारी कोरोना टेस्ट मधुन मुक्त झाल्यानंतर त्यांची वाजतगाजत सरकारी दवाखान्यातुन मिरवणूक काढण्यात आली होती तेव्हा बीडकरांची मान अभिमानाने उंचावली होती.
पोलिस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांचे पोलिस रेकार्ड तपासले तर किती कामचुकार अधिकारी आहेत याची आपणास कल्पना येईल, आम्हा बीडकरांना चांगले माहीत आहे.
मुळ मुद्दा असा आहे कि बीड जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाला आलेल्या ३३ कोटी रुपयांची चौकशी आणि बीड पंचायत समिती मधील अपहार प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलिस अधीक्षक यांना लेखी तक्रारी दिल्या आहेत. आणि निडर,कर्तव्यदक्ष अधिकारी मा. हर्ष पोद्दार साहेब राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या दबावाला बळी पडून काम करत नाहीत. म्हणुन वरिष्ठ स्तरावर त्यांच्या बदलीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु कुठल्या कारणामुळे बदली करावी म्हणून पोलिस खात्यातीलच अधिकारी यांना मोहरा बनवुन मा.हर्ष पोद्दार साहेब यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे,ते हाणून पाडण्यासाठी,त्याची रितसर चौकशी व्हावी यासाठी दि. १३/०७/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर डां.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.