होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांच्या घन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची डॉ सुरेखा मोहोकर यांची मागणी

होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांच्या घन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची डॉ सुरेखा मोहोकर यांची मागणी


पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांच्या घनकचऱ्याचे योग्य ते व्यवस्थापन करण्याची मागणी शेकापच्या नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर यांनी आयुक्तांकड़े केलेली आहे.


          पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हे कोविड रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. सध्या पनवेल महानगरपालिका हद्दीत covid-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पनवेल हददित कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने  रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही रुग्ण होम आयसोलेशन राहून घरच्या घरी उपचार घेत आहेत. अशा रुग्णांचे घनकचरा नेण्याची समस्या निर्माण होत आहे. हा घन कचरा घरी रहिल्यामुले रोगाचा प्रादुर्भाव वाढ़ू शकतो. त्यामुले रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुले रुग्णाच्या घरातील घनकचरा उचलणे वाहून नेणे व त्यांची विल्हेवाट लावू नये याकरिता पनवेल महानगरपालिकेकडून वेगळी व्यवस्था करण्यात यावी तसेच त्यांना पिवळ्या रंगाच्या पिशव्या देण्यात याव्यात अशी मागणी शेकापच्या नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे. 


 









 

ReplyReply allForward