बांधावर बी-बियाणे न देणाऱ्या 'सरकार' ने कमीत कमी विज-बिल तर माफ करावे...... डॉ.जितीनदादा वंजारे


    (बीड प्रतिनिधी --विवेक कुचेकर):लॉक डाउन च्या काळात सरकार शेतकऱ्यांना मोफत बांधावर बी- बियाणे आणी खते देणार होते.हे तर लांबच राहील पण शासनाला शेतकऱ्यांचा राहिलेला कापूस सुद्धा घेता आला नाही याउलट बोगस बी- बियाणे ,बोगस खते सर्रास विक्री केले जातायेत यावर शासनाचा अंकुश नाही मात्र खेड्यापाड्यातही विज बिले घेण्यासाठी विद्युत कर्मचारी हिंडतात ,शेतकरी पेरणी बी- भरणा मुळे जाम अडचणीत आहे तो कर्जबाजारी झाला आहे त्यातच काही शेती मंडळ पीक विम्या पासून वंचित आहे यामुळे शेती करावी का नाही हा प्रश्न समोर असतानाच विज कर्मचारी भले मोठे बिल घेऊन शेतकऱ्यांच्या दारात उभा आहे. हेच का आपल शेतकऱ्यांच सरकार ? 
       मुख्यमंत्री महोदय आपण बांधावर बी-बियाणे, खते देणार होतात ,आपण विज बिल माफ करणार होतात,आपण लॉक डाउन काळात दिलेले वचणे पाळाल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात घडतयं वेगळच .एकीकडे तीन महिने मोफत विज,मोफत राशन,मोफत इंधन आपण घोषित करता मात्र प्रत्यक्षात यातील फार कमी गोष्टी अमलात आणल्या जातात .जनतेच मायबाप सरकार आपण या नात्याने गोरगरीब शेतकऱ्यांची विज बिले माफ करावीत ही आपणास नम्र विनंती .
      तीन महिन्यात रिडींग ला पण कोणी आले नाही त्यामुळे काही जणांची अंदाजे बिले आकारली आहेत जिकी अवाजवी आहेत ती शेतकऱ्यांना न परवडणारी आहे ती तात्काळ रद्द करा आणी लॉक डाउन काळात सर्व बिले माफ करा असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले.ते म्हणाले कोरोना महामारीने सर्वच शेतकरी हैराण आहेत काही शेतकऱ्यांची उन्हाळी  नगदि पिके वाया गेली  त्यामध्ये डांगर,टरबूज,खरबूज,काकडी,डाळिंब,द्राक्षे व इतर फळबाग अशी पिके बाजारपेठ बंद असल्या कारणाने शेताततच सडून गेली, त्यांना खर्च झाला तो सुद्धा मिळाला नाही.काही शेतकऱ्यांचा कापूस अजून घरात सडतो आहे पण शासनाचे याकडे लक्ष नाही आणी यातच विज बिले गगनाला भिडली आहेत,काहींची मोघम अवाजवी बिले आकारली आहेत यामुळे सामान्य शेतकरी,कष्टकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे म्हणून करिता शासनाने वीजबिल माफ करून शेतकऱ्यांवर आकारले जाणारे अवाजवी विज बिले माफ करावीत,सोयाबीन बी न उगवल्याने तात्काळ संबंधित कंपनी वर कायदेशीर कार्यवाही करून त्याचा मोबदला सक्तीने कंपनी ला द्यायला भाग पाडावे ,कापूस उत्पादक उरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी व बोगस खते आणी बी-बियाणे उत्पादक कंपनीन वर तात्काळ गुन्हे दाखल करावेत,शेतकऱ्यांची पीककर्जे तात्काळ खात्यावर वर्ग करावीत असे मत डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.......