"
ऐ ज़िंदगी देख,मेरे हौसले तुझसे भी बड़े हैं ...
आयुष्य कुठपर्यंत साथ देईल हे सांगता येत नाही...
पण जितकं जगायचं न, सालं मोकळं हसून जगायचं..!
घरातल्या, दारातल्या ,कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीकडे गंमतीने लक्ष द्यायचं !..
सिरीयस चेहरा ठेवून आपल्यावर प्रेम करणाऱ्या ला उदास कशाला बरं करायचं..?
एन्जॉय करत राहायचं, प्रत्येक घटनेकडे पोजिटिव्हली बघायचं...
कुणी धोका दिला, घरचे त्रास देतात, दिवस बोर जातो, कोणी भाव देत नाही, हे सारे साले बहाणे आहेत जीवनातले आपल्याला एन्जॉय पासून परावृत्त करण्यासाठी !
पैसे कमवायचेत,घर चालवायचंय, जबाबदारी जास्त आहे, घरचा त्रास मोठा आहे, लोकं नाव ठेवतात, ह्या असल्या छटाक कारणामुळे स्वतःचा गमावू नका,
प्रत्येक दिवस आनंदाने जगण्यासाठी ,कुणाला तरी हसवण्यासाठी, त्याला आपण आहोत असं स्पेशल वाटण्यासाठी काहीतरी करावं,असं काहीतरी आपल्या वागण्यात पाहिजे!
निसर्गाने दिलेल्या शरीर संपत्तीचा महत्वाचा भाग म्हणजे आपला चेहरा.
मग तो कसाही असला तरी तो आपल्या स्वतः साठी जगातला सर्वात सुंदर चेहरा असला पाहिजे!
फेकून द्या साला तो न्यूनगंड! की मी दिसायला असा,तसा!
ज्याचं मन नेहमी दुसऱ्याला आनंदात पाहून खुश होतं तो खरा सुंदर माणूस!
हसण्याची किंमत त्याला विचारा ज्याच्या आयुष्याचे मोजकेच दिवस शिल्लक आहेत असं त्याला समजलेलं असतं...
आयुष्याचा काय भरोसा आहे?जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या खटाटोपात आयुष्याचा आनंद तसाच खितपत पडून राहिला तर त्या आयुष्याला काय अर्थ?
काहींना उदास दिसण्यासाठी कारणांची गरजच भासत नाही आणि काहींना हसण्यासाठी जोक्स चीही गरज लागत नाही...
दिल खोल के खुशी मना मेरे दोस्त,
न जाने कब जिंदगी साथ छोड़ेगी,
आज जो हँस ले जी भर के उसकी,
तकदीर भी साथ नहीं छोड़ेगी...जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड , कामापुरते वापरण्यात, झुकून नमस्कार करण्यात , गोड गोड बोलण्यात व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये. कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते.
म्हणून माणसाने आपल्या विचाराशी कर्तव्याशी , कर्माशी व आचाराशी ठाम राहावे.
अंधारातुन प्रकाशाकडे.. अशी व्यक्ती ज्याच्याकडे भरपुर धन दौलत आहे,प्रतिष्ठा आहे,पण अहंकार आहे,सगळ्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो,दुस-याला कमी समजतो,दुस-याचा तिरस्कार करतो,नेहेमीच बघा मी किती बुध्दिमान आहे,किती मेहनती आहे? अस स्वत:बद्दल मानत असतो.
हातामध्ये चहाचा कप घेऊन खिडकीतून बाहेर डोकावून, मुक्तपणे कोसळणाऱ्या पावसाकडे पहात, त्याचे तुषार अंगावर घेत, गरमागरम चहाचा आस्वाद घ्यावा क्षणभर सर्व विसरून त्या पावसात चिंब होण्याचा मानस आपल्या मनात डोकावून जातो मला सांगा नकळत का होईना तुम्ही एक वेगळ्याच आनंदी क्षणाचे साक्षीदार झालात… स्वर्ग सुख याहून अधिक काय वेगळे असणार आहे. जीवनात प्रत्येकाला जितके सुखाचे क्षण मिळत असतात, त्यापेक्षा दुप्पट दुःखच वाट्याला येतात, दुःख नाही असा कुणीही ह्या कलियुगात शोधून सापडणार नाही… म्हणून काय मग जगणे सोडून द्यायचे…? आत्महत्या करायची…? स्वतःला संपवायचं…जीवन खूप अनमोल आहे, याचा विचार आपण केला पाहिजे…स्वतःला ओळखलं पाहिजे… आपली ताकद ओळखली पाहिजे… आपण कुठे कमी पडतो याचे आकलन केले पाहिजे… या सर्व बाबी जर तपासल्या गेल्या तर जीवनात कसलेच दुःख माणसाला होणार नाही
असो मला फक्त एकच सांगायचे आहे की… माणसाने जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून समाजात वावरले पाहिजे…आलेल्या प्रत्येक क्षणाला आपलं केलं पाहिजे… कारण जीवनात घेण्यासारखं खूप काही आहे… फक्त ते आपल्याला घेता आलं पाहिजे… "हर रोज़ गिरकर भी,
मुक़म्मल खड़े हैं...!
*ऐ ज़िंदगी देख,
मेरे हौसले तुझसे भी बड़े हैं ...!!
हौसले के तरकश में*
*कोशिश का वो तीर ज़िंदा रखो
हार जाओ चाहे जिन्दगी मे सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिन्दा रखो!
आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा..
की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!! प्रा.निलेश इंदुमती अविनाश जाधव,बुलढाणा,7798838877(लेखक हे प्राध्यापक तथा मोटीवेशनल स्पीकर आहेत.