----------------------------------------------
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर):- बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल पशूवैद्यकिय दवाखान्याची संपूर्ण बांधकामासह रंगरंगोटी केलेली ईमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे, तर पशुवैद्यकीय अधिकारी एका दिवसाआड येत असल्याने पशूधन मालकांची गैरसोय होत आहे,कीत्येक वर्षांपासून परिचारक पदे रिक्त आहेत, याप्रकरणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन दिले आहे.
आरुण ढवळे :- पशूवैद्यकिय अधिकारी दवाखान्यात गैरहजर उपचाराअभावी असल्यामुळे बैल मेला
----------------------------------------------- ३ आठवड्यापुर्वी माझ्या दोन्ही बैलांना भोवळ आली, अचानक हातपाय खोडु लागले. मी पशूवैद्यकिय दवाखान्यात धाव घेतली तेव्हा डॉ.अमोल मेहेरकर गैरहजर होते,त्यांना फोन केला असता आज मी लिंबागणेशला येणार नाही, माझी ड्युटी पाली येथील पोल्ट्रीफार्म मधे आहे असे सांगितले, त्यामुळे उपचाराअभावी दोन बैलापैकी एक बैल अंदाजे ६० हजार रुपये किंमतीचा बैल मेला. तलाठी पगारे यांनी पंचनामा केला परंतु केवळ बैल पुरात वाहुन गेला अथवा वीज पडून मेला तरच नुकसान भरपाई शासन देतं अन्यथा नाही असे सांगितले.
डॉ.अमोल मेहरकर:- पशूवैद्यकिय अधिकारी लिंबागणेश,
----------------------------------------------- मला एक दिवस लिंबागणेश येथे तर एक दिवस पाली येथील शासकीय पोल्ट्रिफार्म मध्ये ड्यूटी लावलेली आहे. आरूण ढवळे यांचा बैलं मेला तेव्हा मी लिंबागणेश येथे येऊ शकलो नाही कारण त्यादिवशी माझी ड्युटी पाली येथे होती.अजून एक महिना तरी पाली येथील ड्युटी संपेल असे वाटत नाही.
डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर:- स्थानिक नेत्यांची उदासिनता,आठ दिवसांत जिल्हा प्रशासनाने उद्घाटन केले नाही तर ग्रामस्थ उद्घाटन करतील
----------------------------------------------- लिंबागणेश हे जिल्हापरिषद सर्कलचे गाव असुन सुद्धा कायमस्वरूपी पशूवैद्यकिय अधिकारी नाही, दोन परिचारक पदे कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत ,ते तात्काळ भरण्यात यावेत. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी रोज येणं आवश्यक आहे, एकदिवसाआड अधिकारी येत असल्यामुळे पशुधन मालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ पाली येथिल शासकीय पोल्ट्रीफार्म मधिल सेवा रद्दबातल करुन कायमस्वरूपी लिंबागणेश येथेच ड्युटी द्यावी.तसेच गेली ८ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे तात्काळ उद्घाटन करावे, आठ दिवसात उद्घाटन न केल्यास आम्हाला ग्रामस्थांना उद्घाटनाची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.