सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही...मेरी कोशिश है की ये सुरत बदलनी चाहिए......

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही...मेरी कोशिश है की ये सुरत बदलनी चाहिए.......



दै.मराठवाडासाथी आणि दै.लोकांकितच्या दणक्याने नगरपालिका प्रशासनाला जाग आली,
अखेर नगरपालिकेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धकृती पुतळ्याची दुरुस्ती केली :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


(बीड प्रतिनिधी --विवेक कुचेकर). १४ जुन २०२० वार रविवार रोजी बीड शहरातील महापुरुषांच्या स्मारकांची दुरावस्था, नगरपालिकेचं दूर्लक्ष म्हणुन मा.राहुलजी रेखावार यांना लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती आणि जर नगरपालिकेला कोटयावधी रुपयांची मलिदा मिळवून देणारी रस्ते विकास व ईतर कामामुळे महापुरुषांच्या स्मारकांची दुरूस्ती खर्च पेलवत नसेल तर आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमी वर्गणीतुन स्मारकाची दुरूस्ती करु त्यासाठी जिल्हाधिकारी बीड यांनी परवानगी द्यावी असे लेखी निवेदन दिले होते.
    त्यानंतर त्यांची दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची गळून पडलेली ग्रनाईट बसवण्यात आली.


संवेदनशील पत्रकारांचे आभार  ,दै.मराठवाडा साथी ,दै. साप्ताहिक आठवडा विशेष    ,दैनिक लोकांकीत ,यांचे विशेष आभार
---------------------------------------------


या विषयी बीड जिल्ह्यातील संवेदनशिल पत्रकारांनी आपल्या सुप्रसिद्ध दैनिकात बातमी प्रकाशित केल्यानंतर नगरपालिकेला महापुरुषांच्या स्मारकाची दुरूस्ती करावीच लागली, त्यामुळे हे श्रेय संवेदनशील पत्रकारांचेच आहे, ईतर कुणीही त्यावर हक्क सांगू नये. आणि मला श्रेय घेण्याची आवश्यकता नाही कारण मला त्याचा राजकीय लाभ मिळवून मतांसाठी सहानुभूती मिळवायची नाही...
...श्रेय कोणीही घेऊ द्या. स्मारकाची दुरवस्था संपुष्टात आली हे महत्त्वाचे आहे....
.. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.९४२००२७५७६