दुसऱ्या देशात जाऊन मारू,जश्यास तसे उत्तर देऊ,इट का जबाब पत्थर से देंगे,56 इंच छाती,राऊडी,हौउडी आणि तत्सम चेले,भक्त,चापलुसी मीडिया,आता 20 जवान शाहिद झालेत गप्प का आहात...... ? आता प्रतिउत्तर का नाही ?साधे साधे छोटे देश पण आपल्या मायभूमीवर आक्रमण करायला लागलेत मग वंदे मातरम म्हणणारे चेले भक्त आणि छप्पन इंचाची छाती असणारे नेते सीमेवर सोडा ना .....अखंड जग घुमून आम्हाला इतरांचे गोडवे गायला लावले आणि आत्ता तेच विरोधी देशाला रसद पुरवायला लागलेत मग आता तुमची विदेशनिती गेली कुठे....? आता मारा ना त्यांना त्यांच्या देशात घुसून ......आमचे 20 जवान जीवानिशी गेलेत यांच्या बलिदान फुकट जाऊ देणार का तुमची 56 इंचाची छाती ....? का फक्त इलेक्शन पुरतीच तुमची छाती फुगली होती ...? आता हवा गेली कि काय.....? इकॉनॉमि ढासळली आहे आता गप्प का ......? देशात दलीत-आदिवासी अत्याचार वाढलेत आता गप्प का ....? दलितांचे मत घेऊतोवर त्यांच्या घरी जेवणारे आता कुठे गेलेत दलितप्रेमी नेते ......?
कोरोना अत्याचार हो अत्याचारच ......लोक घरी जाण्यासाठी चालत निघाले,कोणाच्या प्रसूती रस्त्यात झाल्या,कोणी भूखेने मेले,कोणी रेल्वेखाली चिरडून मेले,कोणी चालून चालून अण्ण-पाणी नाही मिळाले म्हणून मेले तर कोणाच रस्त्यात बाळ मेल,कोणी बाप कोणी माय तर कोणी भाऊ ,बहीण गमावली .....मात्र श्रीमंत लोक विमानानेे हजारो किमी चा प्रवास सुखात करून वंदे मातरम म्हणत विमानतळावर उतरले आणि टॅक्सी करून आरामात घरी गेले पण आमचे गरीब बांधव शे पाचशे किमी चे अंतर सुद्धा चालून चालून मेले त्यांना गाडी भेटली नाही,अन्नपाणी भेटले नाही उपाशी मेले.म्हणून आम्ही म्हणतो हे सुटा-बुटातील केंद्राचे सरकार आहे यात काय चूक.
*आणि हे सगळं सरकार चे अपयश एका प्रतिभावान सेन्सिटिव्ह संवेदनशील पत्रकाराने दाखवल म्हणून त्याला जेल मध्ये टाकल त्यावर गुन्हा नोंद झाला .....शोकांतिका ...! आम्ही तर टीव्ही बघणच सोडून दिलंय कारण पॅकेज घेऊन चोचले पुरवणाऱ्या हांजी हांजी च्या बातम्या सांगणारा मीडिया विकलेला आहे हे कळलं.आता आपणच शहाण झालं पाहिजे ,सत्य ते सत्य पाहण्याची वृत्ती ठेवली पाहिजे.भक्तांनी याचा विचार करावा .आणि सुजाण नागरिकाने याचा गांभीर्याने विचार करावा ही विनंती
मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर*