ठाणे (17) कोरोना कोव्हीड-19 महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा तसेच कोव्हीड बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी एमएमआऱडीएच्यावतीने बीकेसी मैदानावर उभारण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड रूग्णालयाचा हस्तांतरण सोहळा तसेच बाळकुम-साकेत येथे १०२४ बेडसचे तळ अधिक १० मजल्यांचे सर्व सुविधांनीयुक्त ठाणे कोव्हीड रुग्णालयाचे ई लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते, राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र ही लढवय्यांची भूमी आहे. त्यामुळे आम्ही कोरोनामुळे डगमगून गेलेलो नाही. खचलेलो नाही. तर लढण्यासाठी सज्ज आहोत अशी ग्वाही दिली. आपण कोरोना कव्हीडचा सामना करण्यासाठी युद्ध पातळीवर सुविधा निर्माण करण्यात येत असून आज प्रत्येक जण एक टीम म्हणून काम करीत आहोत ही अभिमानाची बाब आहे असे सांगितले.
कोरोनाची सुरूवातीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे असे सांगून सुरूवातील आपल्याकडे केवळ दोनच लॅब होत्या आज आपल्याकडे 100 लॅबस<span lang="HI" style="font-size:12pt;font-