जातीय  द्वेषातून खुनाचा  गुन्हा करणाऱ्यांना  फासावर लटकवा -  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


पिंप्री चिंचवड येथे दिवंगत विराज जगताप च्या कुटुंबियांची ना. रामदास आठवले सांत्वनपर भेट घेतली

मुंबई दिनांक 12  - महाराष्ट्रात  जातीय द्वेषातून  दलितांवर  जीवघेणे हल्ले  होण्याचे प्रकार वाढले आहेत. नागपूर येथे अरविंद बनसोड  यांच्या हत्येनंतर आता पुण्यातील  पिंपरी-चिंचवडमधील अवघ्या वीस वर्षांच्या तरुणावर  जातीय द्वेषातून सामूहिक हल्ला करून त्यास जीवे ठार मारण्यात आले. जातीय द्वेषातून दलित तरुणांची  हत्या  करणाऱ्यांना फाशीची  कठोर शिक्षा करावी अशी  मागणी पब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  ना. रामदास आठवले यांनी केली आहे. पिंप्री चिंचवड येथे हत्या करण्यात आलेल्या युवक  दिवंगत विराज जगतापया कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज शनिवारी दि.13 जून रोजी भेट घेटली.