--बीडच्या एसपीला निलंबीत करण्यात यावे़,,,,,
(बीड प्रतिनिधी) बीड तालुक्यातील तांदुळवाडीभिल्ल तांडा येथे जमिनीचा वाद आणि दोन महिलांवर जीवघेणा हल्ला. नग्न धिंड काढण्याची धमकी सुद्धा जातीयवाद्यांनी दिलेली आहे.
पहिला हल्ला झाला महिलांनी तक्रार दिली. नेहमी प्रमाणे पोलिसांनी अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला पण अटक केली नाही. मोठं हत्याकांड होईल म्हणून आरोपीना अटक करण्याची तसदी दाखवली नाही. येथे हत्याकांड होऊ शकतं, केजची पुनरावृत्ती होऊ शकते त्यासाठी परिवाराला पोलिस संरक्षण दिले नाही.
अखेर अटकपूर्व जामीन मिळवून जातीयवादी नराधमानी भिल्ल समाजाच्या या महिलांवर पुन्हा हल्ला चढवला हल्ला एवढा भयानक होता की, महिला गंभीर जखमी आहे. एवढंच नाही तर पुन्हा बांधावर आलात तर नग्न धिंड काढू अशी धमकी सुद्धा दिली.
पोलीस यंत्रणा कुणामुळे एवढि उदासीन आहे कळत नाही. बीडच्या एसपीच्या नाखाखाली रोज दलित अत्याचार घडत असतील तर एसपीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का? डीवायएसपी, पोलीस निरीक्षक यांनी कुणाच्या अजेंड्यावर काम सुरू केलेले आहे याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष प्रा,शिवराज बांगर याना ही माहिती सकाळी मिळताच तांदळवाडीभिल्ल हे गाव सापडून तात्काळ भेट दिली ़
4 दिवस झाले हल्ला होऊन तरी देखील हल्ल्याचा पत्ताच लागत नव्हता. उद्या यांची हत्या करून, नग्न धिंड काढली असती तरी प्रकरण उजेडात आले नसते.
अरविंद बन्सोड हत्याकांड जसे दाबण्याचा प्रयत्न झाला तसेच हे सुद्धा प्रकरण दाबण्याचे षडयंत्र सुरू होते. वंचित बहुजन आघाडीच्या तत्परतेमुळे हे उजेडात आलं.
वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा युवक नेते विवेक कुचेकर हे या घटनेचा जाहीर निषेध करीत असून बीड एसपीला तात्काळ निलंबित करण्याची मागणी करत आहे. ज्या बीड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी पीडितांना तात्काळ संरक्षण का दिले नाही असा जाब विचारत आहे. भिल्ल समाजाच्या जमिनीवरील कब्जा तात्काळ काढण्यात यावा. पीडित कडुबाई पवार, रंजना पवारला तात्काळ संरक्षण द्यावे व आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा युवक नेते विवेक (बाबा) कुचेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे ़