प्रभाग अठरा आणि प्रभाग 19 मधीलओवरहेड इलेक्ट्रिकल लाइन्स भूमिगत केबल मध्ये रूपांतर करण्याची विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी


पनवेल : पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील ठाणा नाका येथील पायोनियर विभाग, म्हात्रे हॉस्पिटल परिसर, नाडकर्णी हॉस्पिटल परिसर तसेच प्रभाग क्रमांक 19 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, टपाल नाका, लाईन आळी, प्रभू आळी येथील विद्युत वाहिन्यांचे ओवरहेड इलेक्ट्रिकल लाइन्स भूमिगत केबलमध्ये रूपांतर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


              पनवेल मनपा क्षेत्रातील मूळ पनवेल शहरात खूप जुने विद्युत खांब व विद्युत वाहिन्या आहेत. हे विद्युत खांब जीर्ण झाले असून विद्युत तारा देखील वारंवार तुटतात व त्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. तसेच अनेक ठिकाणी विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध व काही ठिकाणी गटारात असल्याने गटाराचे पाणी तुंबत आहे. याचा त्रास पालिका सफाई कर्मचाऱ्यांना देखील होतो. त्यामुळे पालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण होत आहे.


       पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत आहे. रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण, तलावांचे सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण प्रगतीपथावर आहे. पनवेल शहर सुंदर दिसण्यासाठी पनवेल शहरात भूमिगत केबल टाक ने अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे प्रभाग क्रमांक 18 ठाणा नाका येथील पायोनियर विभाग, म्हात्रे हॉस्पिटल परिसर, नाडकर्णी हॉस्पिटल परिसर, प्रभाग क्रमांक 19 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, टपाल नाका, लाईन आळी, प्रभू आळी येथील ओव्हरहेड विद्युत खांब आणि विद्युत  वाहिन्या भूमिगत करण्याबाबत पनवेल महानगर पालिकेने विद्युत वितरण कंपनीकडे प्रस्ताव सादर करावा अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी केलेली आहे


 


Attachments area