पनवेल : माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या वाढदिवसानमित्त नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकार यांच्या वतीने आमदार बाळाराम पाटील आणि विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये ठिकठिकाणी 12 सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
१९ जून रोजी पनवेल -उरणचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा वाढदिवस ठिकाठकाणी सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या वतीने ठिकठिकाणी 12 सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या 3 आरोग्य केंद्रात व विद्युत विभाग, पनवेल उपजिल्हा रूग्णालयात 2, पनवेल तालुका व शहर पोलिस ठाण्यात, ज्येष्ठ नागरिक संघ, पनवेल विद्युत महामंडळ, तहसिल कार्यालय, पनवेल पोस्ट आँफिस येथे सॅनिटायझर स्टँड देण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शे.का.प.शहरचिटणिस गणेश कडू, नगरसेविका सारिका भगत, आर डी घरत, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष जोशी, शिरोडकर, समिप विजय मोहोकर यांचे सहकार्य लाभले.
Attachments area