बँड व्यवसायास परवानगी सह विशेष आर्थिक पॅकेजची मागणी
(उस्मानाबाद प्रतिनिधी--अनिकेत हरे) /दि. १७ जून
आज उस्मानाबाद येथे बँजो बँड मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,सध्या जगभरात कोरोना या जागतिक महामारी मुळे सर्व जगाचे अर्थव्यवस्था बंद पडलेली असून 21 मार्च पासून देशात संपूर्ण लॉकडाऊन चालू झालेले आहे.यामुळेच देशाची सर्वच चलन वलन व्यवस्था बंद पडलेली आहे. महाराष्ट्रातील बँड कलाकार ही जागतिक महामारीचा आर्थिक बळी पडलेला आहे. मंगल प्रसंगी, मंगल धून वाजवून लोकांच्या जीवनामध्ये आनंद देणारा बँड व्यावसायिक आणि कलाकार आज हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांचे व्यवसाय आणि त्यांच्याकडे असणारे सर्वच कलाकार त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा, बँड मालक आणि कलाकार यांची संख्या आज महाराष्ट्रभरामध्ये लाखोंच्या संख्येत आहे.
त्यामुळे बँड मालक आणि व्यवसायिकांची आज बैठक पार पडून.,
१).लॉकडाऊन शिथिल झाल्यास जसे; बससेवा, लग्न समारंभ, हॉटेल, खानावळ,. या व्यवसायांना आपण परवानगी दिलेली आहे. त्याच प्रकारे, बँड व्यवसायिकांना देखील काही अटींसह वाजविण्यास आपण परवानगी द्यावी. २).फेब्रुवारी ते जुलै दरम्यान 90% लग्न समारंभाचा, बँड व्यवसायाचा हंगाम असतो, ही बाब लक्षात घेता, आमचा यावर्षीचा व्यवसाय शून्य आहे. तरी सरकारने बँड व्यवसाय आणि कलाकारांसाठी "विशेष आर्थिक पॅकेज" ची मदत जाहीर करावी.३).आजच्या तारखे पासून दहा लोक आणि गाडीला वाजविण्यास परवानगी द्यावी..
इत्यादी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या द्वारे मुख्यमंत्र्यांना सादर केले. या निवेदनावर जिल्हाअध्यक्ष संभाजीभाऊ कांबळे, जि.उपाध्यक्ष सुजित औताडे, जि.मार्गदर्शक लक्ष्मण सगट कोषाध्यक्ष रविंद्र लांडगे, सचिव लक्ष्मण गव्हाणे यांच्यासह जिल्हा भरातील इतर ५५ बँड मालक तथा व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.