वनविभाग आणि तहसिल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डोंगररांगा उद्धवस्त, गौण खनिज चोरी, नैसर्गिक साधनसंपत्तीचा-हास :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -----------------------------------------

वनविभाग आणि तहसिल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डोंगररांगा उद्धवस्त, गौण खनिज चोरी, नैसर्गिक साधनसंपत्तीचा-हास :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
-----------------------------------------------------------------------------बीड शहर डोंगररांगांमध्ये वसलेले शहर असल्या कारणाने चोहोबाजूंनी डोंगररांगांचे वैभव प्राप्त झाले असले आणि निसर्ग, पर्यावरणप्रेमी नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्यासाठी स्वखर्चाने प्रयत्नशील असले तरी काही दुष्टप्रवृत्ती स्वत:च्या फायद्यासाठी जेसीबी व पोकलेन मशिनच्या सहाय्याने डोंगरपायथ्याशी  अवैधरित्या उत्खनन करून गौण खनिज चोरी करत आहेत,तर काहींना शेती करण्याच्या नावाखाली गायरान जमिनीवर अतिक्रमण करत आहेत. तहसिल प्रशासन आणि वनविभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, वनमंत्री,पर्यावरण मंत्री यांना लेखी निवेदन दिले आहे.