आधुनिक काळातील देव आणि दानव:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------(बीड प्रतिनिधी --विवेक कुचेकर )
(टिप:- या ठिकाणी देव हे सदप्रवृत्ती तर दानव हे दुष्टप्रवृत्ती या अर्थाने आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा वादविवाद घालण्यात वेळ वाया घालु नये)
बीड तालुक्यातील मौजे आहेर वडगांव येथिल भुमिपुत्र मा. अभिमान खरसाडे, निसर्ग प्रेमी, पर्यावरणप्रेमी हे स्वत:ची आर्थिक परिस्थिती नाजुक असताना "शिवराई ग्रुप"मित्रपरीवारा समवेत आहेर वडगांव परिसरातील " गैबी पीर बाबा" सुप्रसिद्ध डोंगरमाथ्यावर लाकडाऊनचा सदुपयोग करून विविध ३०० झाडांची वृक्षलागवड केली,
वृक्षारोपण नव्हे तर वृक्षसंगोपण , तारेचे कुंपण:-- अभिमान खरसाडे
----------------------------------------------------------------_-----
केवळ वृक्षारोपण नव्हे तर वृक्षसंगोपण या भुमिकेतुन आम्ही" शिवराई ग्रुप" माध्यमातून निसर्ग व पर्यावरणप्रेमी मित्रांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा करून यथाशक्ती वृक्षारोपण केलेल्या भागामध्ये ताराचे कूंपन लावलेले आहे.विविध प्रकारची ३०० झाडे लावली आहेत. भविष्यात हा डोंगर घनदाट वृक्षांनी वेढलेला पहायला मिळेल.
देवराई ट्रेकिंग ग्रुप मदतीला धावून आला :- रणजित यादव/नितिन मातकर/ पंजाबराव येडे/लक्ष्मण मळेकर
------------------------------------------------------------------------------
बीड शहरातील बहुतांश शिक्षकीपेक्षा असलेल्या" देवराई ट्रेकिंग ग्रुप" च्या माध्यमातून बीड शहराच्या आसपासच्या परिसरातील डोंगररांगांमध्ये पर्यावरण संतुलित राखण्यासाठी बिज रोपण पावसाळ्यात नित्यनेमाने केले जात आहे, बिजरोपन या बरोबरच वनस्पतींची तोंडओळख गुणधर्म, फायदे याबरोबरच योगाचे प्रात्याक्षिक आणि उबाळे सरांची अद्भुत पानाफुलांची व अचंबित करणारी पाटील सरांची फोटोग्राफी कुतूहलाचा विषय ठरली आहे आदि.माध्यमातुन कार्य करणा-या सर्व देवराई ट्रेकिंग ग्रुप मधिल सदस्यांनी मा.अभिमान खरसाडे सरांच्या या "शिवराई ग्रुप" च्या स्तुत्य उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षात उतरवला आहे.