चौसाळा येथे वंचित'कडून डफली बजाव आंदोलन संपन्न
(बीड प्रतिनिधी) केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून आज बीड तालुक्यातील चौसाळा येथे वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते विवेक (बाबा)कुचेकर यांच्या नेतृत्वाखाली डफली बजाव आंदोलन करण्यात आले आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे डफली बजाव आंदोलन करण्यात आले आहे राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन बीड तालुक्यातील चौसाळा येथे वंचित बहुजन आघाडीचे बाला़घाट नेते विवेक(बाबा)कुचेकर यांच्या नेतृत्वाखाली डफली बजाव आंदोलन करण्यात आले
यावेळी विवेक कुचेकर यांनी सर्वसामान्य नागरिकांना भेटुन त्याना डफली बजाव आंदोलनाचे महत्तव समजावुन सांगितले व लोकडाऊनला विरोध का आहे हे देखील समजावुन सांगितले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी बालाघाटावरील वंचित बहुजन आघाडीचे अंसख्य कार्यकर्ते उपस्थीत होते