ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडून इतर शुल्क मागू नये- विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे
यांनी गट शिक्षण अधिकारी पनवेल यांच्याकडे केली आहे.
21 मार्च 2020 पासून सरकारने कोरोना व्हायरस साथीच्या आजारमुळे सतत लॉक डाऊन केले. सर्व आर्थिक आणि व्यावसायिक कामे बंद आहेत. याचा आपल्या सर्वांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. वेतनात कपात , नोकरी गमावणे अशा अनेक विवंचनेतून पालक वर्ग जात आहे. या संदर्भात शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी प्रतिनिधि आणि पालक शाळेला परिवहन शुल्क आणि ऑनलाइन शिक्षण कालावधीत इतर विविध शुल्क माफ करण्याची शाळेला विनंती करत आहेत. आजपर्यंत लॉकडाऊनमुळे त्यांची मुले चालू शैक्षणिक वर्ष 20-21 सुरू झाल्यापासून शाळेत जात नाहीत.
राज्यात ठिकठिकाणी ऑनलाइन शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे पालकांकडून शाळा शुल्क वसूल करत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही शाळा इतर शुल्क देखील मागत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. याला नागरिक त्रासले आहेत. पुन्हा वर्गातील शाळा केव्हा सुरू होईल याबाबत अत्यंत अनिश्चितता आहे. जोपर्यंत ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू आहे तो पर्यंत पालक शिकवणी शुल्क सवलतीच्या दरात भरण्यास तयार आहेत. विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या कालावधीसाठी परिवहन आणि संगणक फी व इतर सुविधा ज्याचा उपयोग विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या काळामध्ये घेत नाहीत या सर्वांची फी माफ करण्याचे आदेश शिक्षण विभागातर्फे द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.
जर मुले वाहतुकीचा व इतर शालेय सुविधांचा लाभ घेत नाहीत तर त्याचे शुल्क आकारणे योग्य आहे का? काही शाळांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी वारंवार एस.एम.एस. केले जातात. पालक वर्ग प्रचंड आर्थिक परिस्थितीबाबत तणावाखाली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे या अगोदरच ऑनलाईन शिक्षण पद्धती मधील शुल्क घेण्याबाबत धोरण ठरवण्याची विनंती केली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित कारवाईची अपेक्षा असल्याचे मत विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
Attachments area