अखेर लढवैय्या लिंबागणेशकरांची झुंज अपुरी ठरली,छुप्यामार्गाने कोरोनाचा शिरकाव
------------------------------------------- (बीड जिल्हा प्रतिनिधी--विवेक कुचेकर ):- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आजपर्यंत स्थानिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नव्हता,काही दिवसांपूर्वी सापडलेला कोरोना बाधित रुग्ण बीड येथील स्थानिक होता आणि आरोग्य सहाय्यक असल्यामूळे १५ दिवसातुन कधीतरी येणे जाणे होते.
आज दि. ११आगस्ट २०२० वार मंगळवार रोजी लिंबागणेश येथिल दोन स्थानिक व्यक्तींचे स्वाब काल तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी एकाव ६५ वर्षीय पुरूष व्यक्तीचा अहवाल आज पाझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या ३८१६ अहवाला पैकी २३० रूग्ण पाझिटीव्ह आले आहेत, त्यापैकी क्रमांक ६० , लिंबागणेश येथिल एक ६४ वर्षीय पुरूष अहवालात कोरोना बाधित आढळलेला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोना संसर्गापासून लढाईत यशस्वी ठरलेल्या लिंबागणेश मध्ये कोरोनाचा अखेर शिरकाव झाला आहे त्यामुळे नागरीकांनी भयभीत न होता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.