छत्रपती शिवाजी महाराज अवमान प्रकरणी अग्रीमा जोशुआ ,सौरव घोष यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना निवेदन :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)  तथाकथित स्टड्अप कामेडीयन अग्रिमा जोशुआ यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि शिवस्मारकाविषयी अपमानास्पद टीपन्नी सौरभ घोष यांनी आयोजित कार्यक्रमात केल्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत, म्हणून संबंधित प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन स.पो.नि.लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्फत देण्यात आले, यांविषयीचे निवेदन लिंबागणेश स्थित जमादार यांच्यामार्फत डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व ग्रांमस्थांनी दिले.
              मुंबई अरबी समूद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल अग्रिमा जोशुआने विनोदातुन टीका केली आहे.हि टीका करताना तिने शिवाजी महाराजांच्या "एकेरी" उल्लेख केला आहे तसेच त्यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरले आहेत.अग्रिमा म्हणाल्या की " शिवाजी या पुतळ्याबाबत आधिक माहिती जाणण्यासाठी मी गुगलवर Quora इंटरनेट सोर्सवर गेली तर कोणीतरी. निबंध लिहिला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टर स्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुस-या एकाला वाटलं काही तरी क्रिएटीव्हिटी कांन्सेंट आहे तो म्हणाला याला जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे,शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समूद्रातुन येणा-या पाकिस्तानी दहशतवाद्यावर नजर ठेवेल.तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा ,बस्स मी त्यालाच फोलो केलं " अशा  शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांची हेटाळणी केली असुन त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे तात्काळ सनबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश पोलिस चौकी जमादार सुरेश पारधी, सोनावणे सुशांत, राऊत संतोष, राख गोविंद, ढोबळे राम यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी सरपंच बाळासाहेब मुळे, संतोष जाधव, शहादेव ढवळें, दिपक कुलकर्णी, दादाराव येडे, बाबासाहेब कदम आदि.ग्रांमस्थ उपस्थित होते.