(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह या निवासस्थानी तोडफोड करणाऱ्या माथेफिरू समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यभर दलितांवरील हल्ले आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दलितांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले यांच्या आदेशावरून महाराष्ट्राचे तरूण तडफदार बीड जिल्ह्यातील गोरगरिबाच नेतृत्त्व शोषित पिडीत वंचितचा आधार व बीड जिल्ह्यातील असंख्य गायरानधारकाचा आधार आमचे लाडके नेते आमच नेतृत्त्व युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष मा. पप्पूजी कागदे साहेब याच्या नेतृत्वाखाली आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालया सह जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालया व पोलिस स्टेशनला निषेध आदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती व वास्तूचा ठेवा असणारे मुंबईतील राजगुरू निवास्थान देशभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असून या राजगृहावर तोडफोड करण्यात आलेल्या घटनेचा रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित व बौद्ध यांच्या वरील हल्ल्याची मालिका राज्यभर सुरू आहे.दलितांवरील हल्ले व अत्याचाराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यभर अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार दलितांना न्याय देण्यामध्ये अपयशी ठरले आहे. आगामी काळात दलितांवरील हल्ले रोखण्यासाठी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणा स्थान असणाऱ्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी दगडफेक करून तोडफोड करणाऱ्या माथेफिरू समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.