कोरोना पॉझिटिव पेशंटचे घर सील करण्यात यावे, संपूर्ण इमारतीला त्याचा त्रास होऊ नये- विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे


पनवेल : पनवेल महानगरपालिकेकडून फक्त कोरोना पॉझिटिव पेशंटचे घर सील करण्यात यावे. संपूर्ण इमारतीला त्याचा त्रास होऊ नये. त्यामुले या गोष्टीचा त्वरित विचार करून ठोस पावले उचलावीत अशी मागणी पालिकेचे आयुक्त प्रीतम म्हात्रे यानी पनवेल महानगरपालिका पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.


            पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आज कोरोना पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा प्रसंगी जी व्यक्ती कोरोना पॉझिटिव येईल अशा व्यक्तीचे ज्या इमारतीत घर आहे ती इमारत सील करण्यात येते. त्या व्यक्तीमध्ये जर का गंभीर लक्षण नसतील तर त्या व्यक्तीला होम कॉरांटाइन सुद्धा करण्यात येते, किंवा तशी व्यवस्था नसेल तर त्या व्यक्तीला इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्रांमध्ये ठेवण्यात येते अशी आपली सध्याची पनवेल महानगरपालिकेची पद्धत आहे. परंतु पेशंट पॉझिटिव्ह होऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला असतानासुद्धा त्याच्या चार दिवसानंतर महापालिकेच्या प्रेसनोट मध्ये ती व्यक्ती पॉझिटिव म्हणून दाखविले जाते व दोन ते तीन दिवसांनी ती व्यक्ती राहत असलेली इमारत सील केली जाते. पेशंटचा रिपोर्ट आणि इमारत सील करण्याचा कालावधी यामध्ये बराच अंतर आहे. या अंतराने बिल्डिंग सील करून कोणतेही उद्दिष्ट साध्य होत नाही. उलट इमारतीमधील नागरिकांना त्याचा नाहक त्रास होतो.


           प्रशासनाला पॉझिटिव्ह व्यक्तीची माहिती मिळाल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव व्यक्ती एक तर होम कॉरांटाइन होते तशी व्यवस्था नसल्यास आपल्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल होते किंवा जास्त गंभीर लक्षणे असल्यास रुग्णालयांमध्ये ऍडमिट होते. कोरोना हा रोग शिंकल्याने, खोकल्याने किंवा पेशंटचे संपर्कात आल्याने होतो. त्या पेशंटचा वावर इमारतीमध्ये सील केल्यानंतरच्या काळात पुढील दहा दिवस होत नसल्यामुळे, अशावेळी ही संपूर्ण इमारत आणि पेशंटचे घर सॅनिटाईझ करून फक्त त्या पेशंटचे राहते घर महानगरपालिकेकडून सील करण्यात यावे. संपूर्ण इमारत सील केल्याने इमारतीतील रहिवाशी यांना नाहक त्रास होत आहे. अशी मागणी प्रीतम म्हात्रे यानी केले आहे. जर फक्त त्या व्यक्तीचे घर सील केले तर अशावेळी इमारतीतील इतर रहिवाशांकडून सुद्धा त्या घरातील इतर सदस्यांना आवश्यक त्या वस्तू पोहोचवणे तसे त्यांची काळजी घेणे हे सोयीस्कर पडते. परंतु सध्याच्या बिल्डिंग सील करण्याच्या पद्धतीमध्ये आपला जो हेतू आहे तो साध्य न होता विनाकारण संपूर्ण इमारतीमधील रहिवासी वेठीस धरले जात आहे.त्यामुले पनवेल महानगरपालिकेकडून फक्त कोरोना पॉझिटिव पेशंटचे घर सील करण्यात यावे. अशी महत्वपूर्ण मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी केली आहे. 


Attachments area