खाजगी रुग्णालयातील कोविड19 उपचाराच्या दरा संदर्भात पनवेल महानगरपालिकेने नियमावली बनवावी:- प्रितम जनार्दन म्हात्रे"






खाजगी रुग्णालयातील कोविड19 उपचाराच्या दरा संदर्भात पनवेल महानगरपालिकेने नियमावली बनवावी:- प्रितम जनार्दन म्हात्रे"

पनवेल : पनवेल महानगरपालिकेने नागरिकांच्या मागणीनुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता केली आहे. त्यामुळे आता आवश्यक त्या गरजेसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. तसेच कोरोना पेशंटचे प्रमाण सुद्धा पनवेल मध्ये वाढत आहे. मात्र काही ठिकाणी कोरोना पेशंटच्या बिलामध्ये लूट चालवली  असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे  खाजगी रुग्णालयातील कोविड19 उपचाराच्या दरा संदर्भात पनवेल महानगरपालिकेने नियमावली बनवावी अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केली आहे. 

         पनवेलमध्ये कोरोना उपचारासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांना महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. परंतु काही खाजगी रुग्णालयांकडून कोरोना पेशंटच्या बिलामध्ये भरमसाठ मागणी करण्यात येत आहे.अशा प्रसंगी सामान्य नागरिक आधीच आर्थिक संकटातून जात असताना सदरचे बिल भरण्यासाठी त्यांची तारांबळ उडते. गेल्या तीन ते चार महिन्यांच्या लॉक डाऊनमुळे नागरिकांचे खिसे रिकामे झालेले आहेत. काहींना बिल भरणे देखील शक्य होत नाही. या गंभीर परिस्थितीकडे पनवेल महानगर पालिकेने जाणीवपूर्वक लक्ष घालून आपल्या आरोग्य विभागामार्फत दरासंदर्भात काही नियमावली बनवावी व ती पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांना लागू करावी जेणेकरून अवाजवी बिलाला आळा बसेल. अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे. 


 

 




 

Attachments area