(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
मी एक सर्व सामान्य बीडकर बोलतोय, आपण तणावात असलेल्यांना बीड पोलिस मानसिक आधार देणार त्यासाठी आपण " प्रोजेक्ट सहायता " मदत कक्षाची स्थापना केली आहे, आणि २४ तास संपर्क साधता येणार आहे ,असं ही कळलं ,
आता आपल्या विभागातील पोलिस कर्मचारी यांना त्यांच नैराश्य आपणास सांगण्याची परवानगी नाही, म्हणुनच त्यांच्या वतीने मी बोलतोय,केवळ आज बोलतोय असं नाही तर गेली ५ वर्षांपासून लेखी निवेदनाद्वारे आपणास बोलतोय, आपण म्हणाल नेमकी समस्या काय आहे ?? नैराश्य पोलिस कर्मचारी यांना का येतंय
ग्रामिण भागातील पोलिस चौकीतील कर्मचारी यांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि शौचालय सुविधा उपलब्ध करुन द्या.:- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर
---------------------------------------------
बालाघाटावरील नेकनूर ठाणे , चौसाळा आणि लिंबागणेश पोलिस चौकी यांना स्वत:ची अशी ईमारत नाही. भाड्याने ईमारत आहे. पण मालक त्यांना पिण्याचे पाणी व शौचालय उपलब्ध करून देत नाहीत.उदाहरणच द्यायचे झाले तर लिंबागणेश येथिल पोलिस चौकितील कर्मचारी यांचे
लिंबागणेश पोलिस कर्मचारी यांची कथा आणि व्यथा
--------------------------------------------
लिंबागणेश पोलिस चौकी अंतर्गत २९ गावे येतात आणि कर्मचारी संख्या ५ आहे. मुक्कामी रहायचे म्हणलं तर १० बाय १० ची खोली आहे. तेच आफिस आणि तेच कार्यालय,तिथेच झोपायचे, दिवसा तिथेच कपडे बदलायचे. पिण्याच्या पाण्यासाठी पोलिसांनाच २० रु प्रति जारचे पाणी घ्यावे लागते. ग्रांमपंचायतला चिटकूनच भिंत आहे. मालक सुद्धा ग्रांमपंचायतच आहे पण ते ना पिण्याचे पाणी ना शौचालय उपलब्ध करून देतात. ते म्हणतात ग्रांमपंचायतलाच शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय नाही तर तुम्हाला कुठुन देणार पण एक गोष्ट लयी भारी बरं का साहेब आमच्या ग्रांमपंचायतने साडे ५ लाख रूपये ग्रांमपंचायत दुरूस्ती वर खर्च कागदोपत्री दाखवलाय ,अगदी एल ईडी टी.व्ही , एअर कंडीशन सुद्धा पण् शौचालय नाही, कारण सरपंच ३ वर्षात फारतर एकदाच आल्या असतिल. बीडला राहतात ना ??? असो. तुम्ही म्हणाल तुम्ही काय केलं तर ते सुद्धा सांगायला हवं.
लिंबागणेश पोलिस चौकी कर्मचारी यांना पिण्याचे पाणी, शौचालय व नविन ईमारत मिळावी म्हणुन मी केलेले प्रयत्न, पुरावे सादर करतोय
----------------------------------------------
१) दि. १/०६/२०१५ रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांना निवेदन दिले होते.
२)दि. ८ जुन २०१५ सोमवार रोजी लिंबागणेश पोलिस चौकी मधिल वरील मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन.
याविषयी दै.लोकाशा दि. ३ जुन २०१५ रोजी " लिंबागणेशची पोलिस चौकी समस्येच्या विळख्यात" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते.तसेच दि. ३ जुन २०१५ रोजी दै.हिंदजागृती बीड या दैनिकात " पारसकर साहेब, ग्रामीण भागातील पोलिसांना तरी मुलभूत सुविधा पुरवा" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते.
३) दि. ७ एप्रिल २०१५ मंगळवार रोजी दै. झुंजार नेता मध्ये " उपोषण करत्यांची सोय करा मागणी साठी लाक्षणिक उपोषण" या मथळ्याखाली प्रसिद्ध बातमी .
४) दि. २६/०१/२०२० रोजी लिंबागणेश येथिल पोलिस चौकी साठी ईमारत बांधकाम मंजुर करणेबाबत घेतलेला ठराव,
सुचक:- डॉ.गणेश ढवळें
अनुमोदक :- गणेश लिंबेकर ग्रां.पं.स.लिंबागणेश ग्रांमपंचायत कार्यालय,ता.जि.बीड
अध्यक्ष :- सौ.निकिता गलधर, सरपंच
५) दि. १७/०२/२०२० रोजी मा.हर्ष पोद्दार साहेब , पोलिस अधीक्षक बीड यांना वरील मागण्यांसाठी दिलेले लेखी निवेदन
६) २६/०२/२०२० रोजी मा. उदृधवजी ठाकरे मुख्यमंत्री,मा. धनंजय मुंडे पालकमंत्री बीड यांना जिल्हाधिकारी बीड, पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्फत दिलेले लेखी निवेदन
७) दि. १२/०३/२०२० रोजी डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
८) दि. १२ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस चौकीत पिण्याचे पाणी व शौचालय उपलब्ध करून देण्यात आले नाही म्हणून ग्रांमपंचायत बरखास्त करा अशी मागणी केल्यानंतर दि. १५ मार्च रोजी ग्रांमपंचायतने शौचालयाचा सांगाडा उभा केला परंतु आज दि. २ जुलै २०२० पर्यंत वापरात नाही, कुलुप लावले आहे, आतील फरशीकाम अजून केलेच नाही. याविषयी दि. १६ मार्च २०२० रोजी दै.मराठवाडा साथी मधे " लिंबागणेश ग्रांमपंचायत वर कारवाईचा इशारा देताच पोलिस चौकीला शौचालय मिळाले" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध आणि दि. १६ मार्च २०२० रोजी दै.पुण्यनगरी मधे स्मार्ट बीड या पुरवणीत " पोलिस चौकीला मिळाले शौचालय" प्रसिद्ध बातमी.
९) दि. १६/०३/२०२० रोजी मुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना वरील विषयी दिलेले निवेदन
१०) आज दि. २/०७/२०२० रोजी जिल्हाधिकारी बीड, पोलिस अधीक्षक बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकासमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन.
जर एका लिंबागणेशल येथिल पोलिस कर्मचारी यांना पिण्याचे पाणी व शौचालय उपलब्ध होत नसेल आणि मला तुम्हाला १० लेखी निवेदन, धरणे आंदोलन, रास्ता रोको आंदोलन आदि.करूनही पोलिस कर्मचारी यांना आपण सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नसाल ,तुमच्या विभागातील पोलिस कर्मचारी यांचे नैराश्य दुर करू शकत नसाल तर उगीचच जनतेला आम्ही मानसिक आधार देण्यासाठी "प्रोजेक्ट सहायता " मदत कक्षाची स्थापना करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळु नका साहेब, पुन्हा एकदा लेखी निवेदन आपणास देऊन विनंती करत आहे आपल्या ग्रामिण भागातील पोलिस कर्मचारी यांना पिण्याचे पाणी शौचालय व स्वत:ची ईमारत या सुविधा उपलब्ध करून द्या. एवढीच नम्र विनंती आहे.