इंडिया बुल covid-19 विलगीकरण केंद्रांमधील समस्या कायम, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी पुन्हा केली पाहणी


पनवेल : पनवेल येथील इंडिया बुल covid-19 विलगीकरण केंद्रांमधील समस्या कायम असल्याचे चित्र दिसत आहे. सात दिवसांपूर्वी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी येथे पाहणी केली होती आणि यावर उपाय योजना करण्याची मागणी केली होती. मात्र शनिवारी 11 जुलै रोजी केलेल्या पाहणीत देखील प्रितम म्हात्रे याना येथील केंद्रांमधील समस्या दिसून आल्या आहेत. त्यामुले त्यानी नाराजी व्यक्त केली आहे. व या समस्या लवकरत लवकर सोड्विण्याची मागणी पालिका आयुक्तांकड़े केली आहे.


            पनवेल महानगरपालिकेच्या कोन येथील covid-19 विलगीकरण केंद्राला विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी 2 जुलै 2020 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील व्यवस्थेची पाहणी केली होती. त्यावेळी तेथील उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. त्या त्रुटी त्यावेळी महापालिका आयुकताना पत्राद्वारे कळविल्या होत्या. त्यानंतर सात दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा पाहणी केली असता अजूनही विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केलेल्या सूचनाचे महानगरपालिकेने दखल घेऊन त्यात सुधारणा केलेली नाही असे आढळून आले आहे. या ठिकाणी एकूण तीन बिल्डींग वापरात असून 506 पेशंटची देखरेख ठेवण्यासाठी  फक्त 4 डॉक्टर असतात. त्यांची संख्या अजून वाढवावी लागेल. पनवेल महानगरपालिकेचे स्टाफ, रुग्ण सेवा देणारे डॉक्टर, रुग्णांना ने-आण करणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालकांसाठी सेनिटायझर उपलब्ध नाही याबाबत विचारणा केली असता स्टॉक संपला आहे असे सांगण्यात आले. आवश्यक गोळ्यांची मागणी केली असता पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत त्या ताबडतोब सर्व उपलब्ध केल्या जात नाहीत, ज्या गोळ्या उपलब्ध केल्या जातात त्यांचे प्रमाणही मागणीपेक्षा भरपूर कमी असते. असे तेथील डॉक्टरांकडून कळले. त्यामुळे अजूनही काही विटामिनच्या गोळ्या अशा आहेत की त्यांचा पुरवठा महापालीकेमार्फत केला गेलेला नाही. असा सवाल प्रितम म्हात्रे यानी उपस्थित केला आहे.


             कोरोनावर अद्यापही कोणतीही लस उपलब्ध नाही, कोरोनाच्या रुग्णांना पौष्टिक आहार मिळायला हवा, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल हेच त्यावरील औषध आहे. परंतु तेथील नाश्ता आणि जेवणाच्या बाबतीत अत्यंत गंभीर तक्रारी आलेल्या आहेत. देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा हा अत्यंत खालावलेला असतो. चपात्याना मुंग्या लागलेल्या आढळले आहे. सकाळचा नाष्टा साडेदहा ते अकरापर्यंत पोहोचतो, दुपारचे जेवण दोननंतर पोहचते, रात्रीच्या जेवणाला सुद्धा उशीर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. येथे असणारया 4 ॲम्बुलन्स पैकी 1 ॲम्बुलन्स महिना झाला तरी देखील नादुरुस्त आहे. पेशंटची ने-आण केल्यानंतर देखील अंब्युलेन्स सेनिटराईज होत नाहीत प्रत्येक वेळी ती सेनिटराईज करणे गरजेचे आहे. तरी या विषयांमध्ये तातडीने व गांभीर्यने  लक्ष घालून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केली आहे.


 


येथे राहणार्या रुग्णाना चांगल्या प्रकारचे जेवण, व उपचार मिळावे व त्यानी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रामाणिक ईच्छा आहे. पनवेल येथील इंडिया बुल covid-19 विलगीकरण केंद्रांमधील समस्या सोड्विण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासनाने याकड़े लक्ष देणे गरजेचे आहे. - प्रितम म्हात्रे , विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका


 


 


 


Attachments area