मास्क, सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक, दुकानदारांकडून 2 लक्ष 83 हजार 900 दंड वसूल 8 दुकानदांरावर गुन्हे दाखल

 



 


                कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 जुलै मध्यरात्री पासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या घरातच थांबून कोरोनाची साखळी खंडीत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. तथापि अत्यावश्यक कामांशिवाय काही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, त्याशिवाय मास्कचा वापर न करणे, सुरक्षित अंतर न ठेवणे अशा सामाजिक आरोग्य हिताच्या गोष्टींचे तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक आरोग्याला धोका पोहचत असून अशा बेजाजबदारपणे वागणा-या नागरिकांवर महापालिका व पोलीस प्रशासन यांच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.


      अशाप्रकारे सामाजिक अंतराचे पालन न करणा-या बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील 8 दुकानदारांवर सामाजिक अंतर पालन करण्याचे भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.              त्याचप्रमाणे मास्कचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांमध्ये पुरेसे अंतर न राखणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा सामाजिक आरोग्याला बाधा पोहचविणाऱ्या नागरिक, दुकानदार व आस्थापना यांच्याकडून 10 जुलै रोजी एकूण रू. 1 लक्ष 49 हजार 200 तसेच 11 जुलै रोजी एकूण रू. 1 लक्ष 34 हजार 700 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.


 
























































विभाग



दि. 10/7/2020



दि. 11/07/2020



बेलापूर



50,400/-



12,500/-



नेरूळ



500/-



15,000/-



वाशी



2000/-



12,000/-



तुर्भे



23,500/-



6,500/-



कोपरखैरणे



12,000/-



24,500/-



घणसोली



33,500/-



27,500/-



ऐरोली



24,500/-



34,800/-



दिघा



2,800/-



1,900/-



एकूण



1,49,200/-



1,34,700/-



 


       


      लॉकडाऊनची अंमलबजावणी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करण्यात येत असून या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे, अत्यावश्यक काम असेल तर घरातील एकाच माणसाने मास्क परिधान करुन घराबाहेर पडावे व काम झाल्यावर लगेच घरी परतावे. घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे व आपले हात साबण आणि पाण्याने नियमीतपणे स्वच्छ धुवावेत आणि स्वत:च्या व आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे व घरातच थांबावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.


 









 

ReplyReply allForward