कोरोना पेशंटसाठी विलगीकरण केंद्रामध्ये तात्पुरते ऑक्सिजन सुविधेसह बेडची व्यवस्था करावी- विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे


पनवेल :  2 जुलै रोजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी इंडिया बुल येथील पनवेल महानगरपालिका विलगीकरण केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी केलेल्या सूचनांमुळे परिस्थितीमध्ये थोडेसे बदल जाणवले आहेत. त्यामुळे कोरोना पेशंट साठी विलगीकरण केंद्रामध्ये तात्पुरते ऑक्सिजन सुविधेसह बेडची व्यवस्था करावी अशी महत्वाची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.


           आजच्या कोरोना पेशंट रिपोर्टनुसार पनवेलमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोन येथील  विलगीकरण केंद्रामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोविड 19 रुग्णालयांमध्ये  बेड उपलब्ध नसतात. अशा प्रसंगी केंद्रामध्ये काही पेशंटला ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांना ते मिळत नाही. त्यामुळे  पनवेल महानगरपालिकेच्या वतीने केंद्रामध्ये 24 तास दोन नर्स आणि कमीत कमी पाच बेड ऑक्सिजन सुविधेसह  व्यवस्था करावी.जेणेकरून रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत रुग्णाला ऑक्सीजन सेवा मिळेल व त्यांना लवकर बरे होण्यास मदत होईल. त्याप्रमाणे रुग्णांना गरम पाणी पिण्याची  व्यवस्था  तसेच सध्या पावसाचे दिवस आहेत थंड वातावरण असते अशा वेळी गरम पाणी आंघोळीसाठी मिळण्यासाठी उपाययोजना करावी त्यात किमान ज्या बिल्डिंगमध्ये पेशंट आहेत तेथील प्रत्येक फ्लोर वर एक पिण्याच्या पाण्याचा फिल्टर आणि गरम पाण्याचा गिझर याची तातडीने व्यवस्था करावी


        तसेच तेथील डॉक्टरांकडून मागणी करण्यात आलेल्या औषधांची 100% पूर्तता अजूनही होत नाही काही औषधे मिळत नाहीत ,जी मिळतात ती अपुरी मिळतात ही फार गंभीर अवस्था औषधांच्या बाबतीत तेथे आहे. यावर नियोजन करावे अशा प्रकारची सूचना विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून पनवेल महानगरपालिकेला करण्यात आली आहे. तसेच कोरोना पेशंट साठी विलगीकरण केंद्रामध्ये तात्पुरते ऑक्सिजन सुविधेसह बेडची व्यवस्था करावी अशी महत्वाची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.


 


Attachments area