महापालिका आयुक्तांनी पिंजून काढली नौपाड प्रभाग समिती आनंदनगर, कोपरी, जांभळी नाका, खारटन रोड, परबवाडी येथे पाहणी कोरोनामु्कत रूग्णांशीही साधला संवाद  


ठाणे (1) रोज एक एक प्रभाग समितीची पाहणी करून तेथील कोरोना कोवीड 19 ची परिस्थिती समजून घेण्याबरोबरच इतर कामाचा आढावा घेण्याचा दिनक्रम सुरू केलेल्या महापालिका आयुक्त डॅा विपिन शर्मा यांनी आज जवळपास चार तास नौपाडा प्रभाग समिती पिंजून काढलीया पाहणी दौऱ्यात त्यांनी कोरोना मुक्त झालेल्या कोवीड योद्ध्यांशीही संवाद साधून त्यांची विचारपूस केली.


      आज सकाळी दहा वाजता महापालिका आयुक्तांनी महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या समवेत कोपरी आनंदनगर परिसराची पाहणी केलीया भेटीत त्यांनी आनंदनगर येथे सुरू असलेले फिव्हर क्लिनिकसार्वजनिक शौचालयेतसेच गल्ल्यांमध्ये जावून तेथील स्वच्छतासाफसफाईनाले सफाई आदींची पाहणी केली.


यानंतर त्यांनी चेंदणी कोळीवाडा प्रतिबंधिक क्षेत्राची पाहणी केलीचेंदणी कोळीवाडा परिसरात त्यांनी एकविरा देवी मंदीरविठ्ठल मंदीर रोडस्वनारायणराव कोळी चौककोळीवाडा गावमीठबंदर रोडचंद्रकांत नाखवा कोळी चाळसिमेंट गल्लीयुनायटेड स्पोर्टसआनंदभारतीहरियाली तलावराऊत शाळा या परिसराची पाहणी केलीतसेच या परिसरातील कोरोनामुक्त रूग्णांच्या घरांना भेटी देवून त्यांच्याशी विचारपूस केलीयावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक भरत चव्हाणस्थानिक नेते रमाकांत पाटीलमाजी नगरसेवक गिरीष राजेश्रुतिका मोरेकर आदी उपस्थित होते.


      चेंदणी कोळीवाड्यानंतर डॅाशर्मा यांनी बी केबीनरेल्वे लाईन येथील प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केलीतसेच येथील कोरोनामुक्त झालेल्या कोवीड योद्ध्यांची विचारपूस केलीयावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुलेनगरसेवक सुनेश जोशीनगरसेविका सौमृणाल पेंडसेसौनम्रता कोळी आदी उपस्थित होतेत्यानंतर जांभळी नाका मुख्य धान्य बाजाराची फिरून पाहणी केलीतसेच नागसेन नगरखारटन रोडचीही पाहणी केलीया ठिकाणी स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटेसुनील हंडोरे आदी उपस्थित होते.


      यावेळी डॅाशर्मा यांनी हाजुरीमनोरूग्णालय परिसराची पाहणी करून तेथील माहिती जाणून घेतलीयावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती विकास रेपाळेनगरसेविका सौनम्रता फाटकमाजी नगरसेविका आणि वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या सौनम्रता भोसले आदी उपस्थित होते.


      या दौऱ्यात महापालिका आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडेउप आयुक्त संदीप माळवीअशोक बुरपल्लेमाहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकरसहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगेकार्यकारी अभियंता श्रीअमृतकर आदी उपस्थित होते.


 


चौकट


वृद्धाच्या मदतीसाठी धावले महापालिका आयुक्त


चेंदणी कोळीवाडा येथे महापालिका आयुक्तांचा पाहणी दौरा सुरू असतानाच एका स्थानिक व्यक्तींने रस्त्यावर एक वृद्ध गृहस्थ पडला असल्याचे सांगताच महापालिका आयुक्तांनी तात्काळ धाव घेवून त्याला पाणी पाजण्यास सांगितलेतसेच त्याला रूग्णवाहिका बोलावून तातडीने निवारा केंद्रात नेण्याचे आदेश दिले.  



 



 


फोटो ओळ


1.  महापालिका आयुक्त डॅाविपिन शर्मा यांनी आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या समवेत आनंदनगर कोपरी परिसराची पाहणी केली.


2.   चेंदणी कोळीवाड्याची पाहणी करताना महापालिका आयुक्तसोबत नगरसेवक भरत चव्हाणमाजी नगरसेवक गिरीष राजेस्थानिक नेते रमाकांत पाटील.


3.  बी केबीनरेल्वे लाईन परिसराची पाहणी करून कोरोनामुक्त व्यक्तींशी संवाद साधताना.


4.  महापागिरी मुख्य धान्य मार्केटनागसेन नगर तसेच मनोरूग्णालय परिसराची पाहणी करताना.