कोवीड 19 अंतर्गत विशेष साफसफाई मोहिम एकाच प्रभागात होणार इतर प्रभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सफाई रोज एक प्रभाग समिती होणार चकाचक – महापालिका आयुक्तांची संकल्पना

                      दिनांक : जुलै, 2020


 



ठाणे (1) महापालिका आयुक्त यांच्या संकल्पनेतून कोवीड 19 अंतर्गत विशेष साफसफाई मोहिम आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीपासून सुरू करण्यात आली. या मोहिमेतंर्गत एक दिवस एका प्रभाग समितीमधील सर्व परिसराची स्वच्छता त्या प्रभाग समितीचे तसेच लगतच्या दोन प्रभाग समितीमधील उपलब्ध सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एकत्रितपणे करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी स्वतः या मोहिमेला भेट देवून या मोहिमेचे काम कशा पद्धतीने काम चालत आहे याची माहिती घेतली.


      नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीशिवाय वागळे प्रभाग समिती आणि उथळसर प्रभाग समितीमधील जवळपास 315 कर्मचारी त्यांच्या प्रभाग समितीमधील आपली नियमित साफसफाई करून या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. या मोहिमेतंर्गत आज सिडको रोड, शिवाजी पथ, खारटन रोड, सुभाष पथ, महागिरी परिसर, खारकर आळी, घंटाळी, शाहू मार्केट, पाचपाखाडी, नौपाडा गार्डन, सिद्धेश्वर तलाव, चेंदणी कोळीवाडा, कोपरी गाव या ठिकाणी साफसफाई करण्यात आली.


      यामध्ये जुना साचलेला कचरा, रस्ते, गटर साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करण्यात आली.


 


 


फोटो ओळ – गावदेवी मैदान येथे कोवीड 19 अंतर्गत विशेष साफसफाई मोहिमेची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा.  


 


....................................................