भिमप्रेमींनो आपला खुळखुळा झालाय काय?? :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 


राजकिय पुढारी भावनिक आवाहन करुन,आपला खुळखुळा वाजवुन नंतर फेकुन देतिल ,यांचा विचार एकदाच थंड डोक्याने करा :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 


फेसबुकवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, महापरिनिर्वाण दिनानिमित्त भरभरून पोष्ट करणा-या भिमप्रेमींनी विचार करायला हवा......माझ्य रक्तातला भिम नेमकं कुठं हरवलाय.... मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे सोडून राजकीय पुढा-यांच्या हातचे खेळणं तर आपण होत नाहीत ना ,??


१४ एप्रिल २०२० डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जेव्हा घरी बसून जयंती साजरी करा असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले तेव्हा मी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी  घराच्या बाहेर पडुन ५ गावातील दलित वस्ती मधिल वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला १) लिंबागणेश २) मुळुक ३) सोमनाथ वाडी ४)बेलगाव ५) पोखरी


सर्व ठिकाणी समस्या समान
१) पिण्याच्या पाण्याची सोय नाही
२) रस्ते सुस्थितीत नाहीत,काही ठिकाणी केलेच तर स्थानिक दलित नेत्यांचे पोट भरण्यासाठी,६ महिन्यातच धुराळा
३) समाजमंदिरांची दुरावस्था
४) रेशनकार्ड आणि स्वस्त धान्य दुकानदार करीत असलेला घोटाळा
५) सरपंच यांचे या लोकांकडे केवळ निवडणुकीच्या काळात रोटी आणि बोटी आणि चपटी देऊन मत घ्यायचं आणि नंतर वा-यावर सोडून द्यायचं
६) या गोरगरीबांच्या नावे असणा-या योजना म्हणजे रमाई घरकुल ,  संजय गांधी, निराधार आदि,    जि.प. , पं.स. , समाज कल्याण विभाग मार्फत योजना धनदांडग्यांच्या घशातच ......
... याचवेळी हातातील संविधानाकडे पाहिलं, बाबासाहेब काय विचार करत असतिल, ज्यांनी थोडंफार शिक्षण घेऊन सूस्थितीत आले ते सुद्धा दलितांच्या उद्धारासाठी न झटता उच्चवर्णीय समाजातील पुढा-यांसमोर गोंडा घोळताना दिसू लागले. 
शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा
-----------------------------------------------
जे थोडेफार शिकले तर यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी समाज संघटीत होऊ दिला नाही, समाज संघटीत केलाच तर ईतरांच्या दावणीला बांधण्यासाठी , आणि संघर्ष राजकीय पुढा-यांची सुपारी घेऊन आपल्याच दलित बांधवांच्या विरोधात.


तसं पाहिलं तर १४ वा वित्त आयोगाच्या निधीतून या समाजातील लोकांसाठी केला जाणारा खर्च ईतर ठिकाणी खर्च करता येत नाही,ईतरत्र वळवता येत नाही, त्यामुळे दरवर्षी ग्रांमपंचायत किती निधी खर्च करते आणि कशासाठी खर्च करते याचा पारदर्शकपणे हीशोब होणं गरजेचं आहे.
दलित वस्ती साठी स्वतंत्र विहीर, पाइपलाइन आदि. गोष्टी कागदोपत्री दाखवून लाखोंचा निधी पुढा-यांच्या घशात जातोय आणि महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते अथवा खासगी बोअरवेल वरुन हातपाय पडुन पाणी आणावं लागतं
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करणारे सोशल मीडिया वरील बाबासाहेब प्रेमींनी या गोष्टींचा विचार करावा....
एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो....
.. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर