जमिनीच्या वादातून दलित-आदिवासींचे अजून किती खून बीड जिल्हा प्रशासनाला पहायचे आहेत. भिमराव दळे , प्रा. शिवराज बांगर
(बीड प्रतिनिधी-- विवेक कुचेकर) तांदळवाडी भिल्ल याठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून भिल्ल समाजाच्या लोकांवर जमिनीच्या वादातून हल्ले होत आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी भिल्ल तांदळवाडी येथील कडूबाई पवार, रंजना पवार यांच्या जमिनीवर गावगुंडांनी अतिक्रमण केलेले असून ते का केले अस विचरले म्हणून मारहाण केले केली होती. बीड ग्रामीण पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला होता. पण पोलीसानी आरोपीना अटक केली नव्हती त्यांना कोर्टाने अटकपूर्व जमीन मंजूर केली आणि दुसर्या दिवशी गावगुंड भिल्ल समाजाच्या घरावर चालून गेले आणि पुन्हा त्या महिलांना गंभीर मारहाण करून नग्न धिंड काढण्याची धमकी दिली.. "साहेब आम्हाला वाचवा आम्हाला न्याय द्या असा टाहो कडूबाई आणि सुनेने वंचित चे जिल्हाध्यक्ष बांगर सर आणि सहकारी यांच्या समोर फोडला आहे"
साधारण एक महिन्यापूर्वी मांगवडगाव या गावी जमिनीच्या वादातून पारधी समाजातील 3लोकांची हत्त्या करण्यात आली होती.
तरीही पोलिस प्रशासनाला जाग येत नसेल आणि पून्हा आदिवासी समाजातील महिलांवर जमिनीच्या वादातून हल्ले होणार असतील आणि पोलिस आरोपींना पाठीशी घालणार असतील तर वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही अशा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी दिला आहे.
अन्यायग्रस्त कुटुंबाला भेट देतेवेळी राज्यसचिव भीमराव दळे किरण वाघमारे नरवडे सर....