<no title> हेमंत मुसरीफ पुणे. 9730306996.

 
































Hemant Musrif musrif.hr@gmail.com




2:44 PM (5 hours ago)
 


 










to Dme






 

 

 

 



 

 




तयारी ..

 

तयारी  करू मनाची

जगू  कोरोना सहीत

समारंभ  ते  मोठाले 

आत्ताच  करू रहीत

 

जाईल असूर त्वरीत 

नको उगाचं भाकीत

दडपणाखाली  असे

का व्हायचे भयभीत 

 

जहर कितीही  सुंदर 

कोण  होईलं मोहीत 

स्पर्श करे  का कुणी 

अग्नीअसता माहीत 

 

निमीत्ते  लागे शिस्त

लढत राहू  शिस्तीत 

सदैव सतर्क असावे

वाढ करावी गस्तीत

 

बदल  घडे  चांगला

बेफिकीर या वृत्तीत

बंधने  नको उक्तीत

यायला हवे  कृतीत

 

 हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 

2)

योध्दा  ..

 

भले  चांगले  पुढारी

होई कोरोना बाधीत 

खिळ चालू गाडीला

नाव  नोंदले  यादीत 

 

समाज कार्यात व्यग्र 

नसती तेव्हा शुध्दीत 

रयत वाचायला हवी

एकचं  ध्येय  बुध्दीत

 

लोकांचा नडे उत्साह

त्यांच्या  दौरा  भेटीत

चूक नसता  कुणाची

घडते  असे  अघटित 

 

कोरोना शोधतो संधी

नेते असताना  गर्दीत

हळूच  घुसतो शरीरी

सुसज्ज  जरी वर्दीत

 

जपावे जरा स्वतःला

कोरोना हा  बुबुक्षीत

आपण आम्हांस हवे

योध्दा राहो  सुरक्षीत

 

- हेमंत मुसरीफ पुणे ..

  ९७३०३०६९९६.

 

शामची आई ..

 

शामची आई परिस

सुविचारांनी मढवलं

उमजू लागली आई

अंतरातूनि   रडवलं 

 

पुस्तक  नव्हे अमृत

कित्येकांना घडवलं

पिढीजात  खजिना

शारदासन   गढवलं

 

नात्यांचं रेशीमबंधन

प्रेमधाग्यात जुडवलं

कुकर्म करत असता

वेळी उचीत अडवलं

 

संस्कार संस्कृतीतून

रोप मायेत  वाढवलं

कुविचार  वादळाला

सिमेवरती  भिडवलं

 

सुगंध सदैव  दरवळे

अत्तर  कुठे  दडवलं

विरळाच कुणी मुर्ख 

पुस्तक न  आवडलं

 

- हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996..

 

केस ..

 

केस जाई हाताबाहेर 

कधी  उघडता सलून

आधी  पीक भरघोस

त्यात आला  मान्सून 

 

जटाधारीबाबा झालो

बायको घेई  चिडवून 

रूप झाले असेकाही 

मुले उठतात दचकून 

 

करे साजरे  बालदिन

कुणी घरातचं  राहून

एवढे बा  होते  कमी 

तेही घेतलेयं  शिकून 

 

माहीती  नाही  किती

दिवस काढावे अजून 

सर्दी मात्र  जाम  होई

केस  जाताचं भिजून

 

आदराने  पाहतो  मी

टकल्या  येता  कुठून 

उगा  हसलो आपणा

क्षमामागे हात जोडून 

 

- हेमंत मुसरीफ पुणे 

 ९७३०३०६९९६.

 

 

सर नमस्कार 

अनेक कविता पाठवल्या आहे. 

 

कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावी ही नम्र विनंती पीडीएफ अवश्य पाठवा


 

 



 



 















ReplyReply allForward