ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण आणि क्रेडाई एमसीएचआय, ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे तात्पुरत्या स्वरुपात निर्माण करण्यात आलेल्या ठाणे कोव्हीड रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक 17 जून, 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते, राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री मा.ना.डॉ.श्री.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत व महापौर मा.श्री.नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित रहावे, ही विनंती.